जिद्द व चिकाटीच्या जोरावर एक महिला शेतकरीही मोठी प्रगती करू शकते याचे जिवंत उदाहरण खैरगाव येथील शोभा गायधने ठरत आहेत. पंधरा एकर शेत जमिनीत त्या प्रामुख्याने हळद आणि इतर आंतर पिके घेतात. शेतीच्या जोरावर वर्षाला किमान सोळा लाखांची उलाढाल करणाऱ्या शोभा गायधने यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना कृषी भूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार देऊन गौरव केला आहे. खैरगाव या छोट्याशा गावातील शोभा गायधने या इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायीच ठरत आहेत.
हळद बहुगुणीहळद ही वनस्पती बहुगुणी असून त्यात औषधी गुणधर्म आहे. पुरातन काळापासून भारतीय लोक स्वयंपाकात हळदीचा चापर करतात. ओल्या हळकुंडापासून भाजी तसेच लोणचे तयार केले जाते. हळदीचा वापर खाद्य पदार्थाला रंग व चव आणण्याव्यतिरिक्त धार्मिक कार्यातही केला जातो. हळदमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्त शुद्ध होते, त्वचेच रंग उजळतो, ही जंतुनाशक असल्याचे सांगण्यात येते.
जीवामृत, दशपर्णी, निंबोळी अर्काचा करतात वापरकठोर परिश्रम घेत सेंद्रिय शेती करून वावगाव हळदीचे पीक घेणाऱ्या शोभा गायधने सध्या लाखो रुपयांचे उत्पादन घेत आहेत. त्यांनी हळद आणि इतर भाजीपाला वर्गीय पिकाची लागवड करून शेत जमिनीला हिरवा शालू सविला आहे. पंधरा एकर शेतीत त्या मागील २२ वर्षांपासून जीवामृत, दशपर्णी आणि निंबोळी अर्काचा वापर त्या मुख्य हळद तर आंतरपीक म्हणून इतर पिके घेतात. त्यामुळे शेतीची पोतही सुधारत असल्याचे त्या सांगतात.
एक एकरात घेतात बारा ते तेरा क्विंटल हळदीचे उत्पन्नशोभा गायधने यांनी शेतीला मुख्य व्यवसाय बनवून उन्नती साधली आहे. पंधरा एकर शेत जमिनीत त्या प्रामुख्याने वायगाव हळद आणि त्यासोबतच ज्वारी, गहू, हरभरा, लिंबू, शेवगा आदी विविध प्रकारचे भाजीपाला वर्गीय व फळांचे उत्पादन घेतात. एक एकरात त्या बारा ते तेरा क्विटल वायगाव हळदीचे उत्पन्न घेतात.
शेततळ योजनेचा घेतलाय लाभशेती निसर्गावर अवलंबून राहिल्यास अनेकदा नापिकीला तोंड द्यावे लागते. यावर उपाय म्हणून शोभा गायधने यांनी शासनाच्या शेततळे योजनेचा लाभ घेतला. शेतात ५० बाय ५० मीटरचे शेततळे खोदले. आता त्यांच्या शेतात २४ तास पाणी उपलब्ध असते. शोभा गायधने या परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात.
असा कमवितात निव्वळ नफाहळद सोबतच हळदीचे बेणे, कच्ची हळद, हळद पावडर विक्री देखील शोभा या करतात. शिवाय विविध शासकीय तसेच खाजगी प्रदर्शनी, कार्यशाळा, सभांमध्ये भौगोलिक मानांकित वायगाव हळदीचा प्रचार-प्रसाराचे महत्त्वाचे काम त्या करतात. तसेच गहू, हरभरा, लिंबू, शेवगा आणि भाजीपाला विक्री मधूनही त्यांना चांगला नफा मिळतो. या सर्व गोष्टींचा हिशोब लावल्यास वर्षाला पंधरा ते सोळा लाखांची उलाढाल शोभा या शेती मधून करतात.
सुधीर खडसे