Lokmat Agro >लै भारी > अमेरिकन चिया सिड्सचा डोंगरगावच्या मातीत यशस्वी प्रयोग, ३ किलोत एकरी ८ क्विंटलचा उतारा

अमेरिकन चिया सिड्सचा डोंगरगावच्या मातीत यशस्वी प्रयोग, ३ किलोत एकरी ८ क्विंटलचा उतारा

Sowing of American chia seeds in Dongargaon soil, 8 quintal per acre at 3 kg | अमेरिकन चिया सिड्सचा डोंगरगावच्या मातीत यशस्वी प्रयोग, ३ किलोत एकरी ८ क्विंटलचा उतारा

अमेरिकन चिया सिड्सचा डोंगरगावच्या मातीत यशस्वी प्रयोग, ३ किलोत एकरी ८ क्विंटलचा उतारा

अल्प खर्चात भरघोस उत्पादन,आयुर्वेदिक शरीर उपयोगी विविध आजारावर चिया वनस्पतीचा यशस्वी प्रयोग..

अल्प खर्चात भरघोस उत्पादन,आयुर्वेदिक शरीर उपयोगी विविध आजारावर चिया वनस्पतीचा यशस्वी प्रयोग..

शेअर :

Join us
Join usNext

मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील उपक्रमशिल शेतकरी बालाजी दत्तराव महादवाड यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत अमेरिकेत येणाऱ्या 'चिया' सीडस रोपाची लागवड केली असून आयुर्वेदिक शरीर उपयोगी विविध आजारावर मात करणाऱ्या चिया वनस्पतीचा डोंगरगावच्या मातीत यशस्वी प्रयोग केला आहे.

जोमाने आलेल्या चिया पिकाचे उत्पादन होणार असल्याने अमेरिकेतील पीक, जोमाने आलेल्या चिया पिकाचे उत्पादन होणार असल्याने अमेरिकेतील पीक डोंगरगाव शिवारात भरगच्च आले आहे. नवीन पिकाच्या पाहणीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. शेतकरी महादवाड यांनी शेतकरी सहलीमध्ये सहभाग घेऊन मध्यप्रदेश, तुळजापूर अशा विविध ठिकाणी शेतीविषयक माहिती मिळवण्यासाठी पाहणी केली आहे. त्यामध्ये त्यांना मध्यप्रदेशमधील निमोचन या गावी चिया सिडची शेती पहावयास मिळाली. यावेळी त्यांनी त्याच शेतकऱ्यांकडून चिया सीड्स बाबत सखोल माहिती करून घेऊन कमी खर्चात भरघोस उत्पादन देणारी चिया शेती असल्याने यावर अभ्यास करून प्रयोग यशस्वी केला आहे.

९० दिवसात २ लाखांचा नफा

त्यांनी एका एकरात 3 किलो बीज पेरणी केली. त्यांच्या शिवारातील पिके जोमात असून १ एकरी आठ क्विंटल पर्यंतचा उताराही मिळवणार असल्याचे त्यांनी सांगितले. बियाणे खर्च उगळता कुठल्याही खताची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले, कमी खर्चात भरघोस उत्पादन देणारे हे पीक असून ९० दिवसांत २ लाखांचा नफा देते.

संबंधित- चिया लागवड, हर्बल गार्डनसह प्रगत शेतीची वाट दाखविणाऱ्या 'प्रीती हरळकर' 

कुठे आहे बाजारपेठ?

शेतकयांना वरदान ठरणारे हे पीक आहे. चिया पिकाची सध्याची बाजारपेठ नाशिक, तुळजापूर या ठिकाणी असून, ३० हजारापर्यंत भाव मिळतो

मध्यप्रदेश येथील निमोचन मंडी येथे शेतकऱ्यांनी या पिकाची विक्री केली तर त्या ठिकाणी ३६ हजारा पर्यतचा भाव मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. चिया बिजास भिजवून खाल्ल्यास दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम त्यातून मिळते.

रुपयांचा भाव मिळत असल्याने एकरी ११० दिवसात झिरो मेंटनस झिरो खर्च व २ लाखाचे उत्पादन होणार असल्याचे महादवाड यांनी सांगितले. अनेक शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देत आहेत.

Web Title: Sowing of American chia seeds in Dongargaon soil, 8 quintal per acre at 3 kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.