Lokmat Agro >लै भारी > वडिलोपार्जित कांदा पिकाला फाटा! रेशीम शेतीत मिळवले यश 

वडिलोपार्जित कांदा पिकाला फाटा! रेशीम शेतीत मिळवले यश 

splitting the ancestral onion farmer made successful sericulture chhatrapati sambhajinagar vaijapur farmer | वडिलोपार्जित कांदा पिकाला फाटा! रेशीम शेतीत मिळवले यश 

वडिलोपार्जित कांदा पिकाला फाटा! रेशीम शेतीत मिळवले यश 

वैजापूर तालुक्यातील हे शेतकरी आज घडीला रेशीमच्या वार्षिक ०८ ते १० बॅच घेत आहेत.

वैजापूर तालुक्यातील हे शेतकरी आज घडीला रेशीमच्या वार्षिक ०८ ते १० बॅच घेत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

- रविंद्र शिऊरकर

वैजापूर : पारंपरिक कांदा पिकांत लागवड व काढणीसाठी मजुरांची भासणारी कमतरता, साठवणुकीची तारांबळ आणि बाजारभावांची नसलेली हमी यामुळे शेतीत नवीन पर्याय शोधणाऱ्या शेतकऱ्याने रेशीम शेतीमध्ये चांगला नफा कमावला आहे. वैजापूर तालुक्यातील हे शेतकरी आज घडीला रेशीमच्या वार्षिक ०८ ते १० बॅच घेत आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील देविदास नारायण जाधव यांना एकूण ५ एकर शेती आहे. ज्यामध्ये ते कापूस, मका, कांदा हे मुख्य पिके घेतात. ऑगस्ट २०१६ साली त्यांनी सुरुवातीला एक एकर क्षेत्रात तुती लागवड केली व जालना येथून अंडीपुंज आणून रेशीम शेतीस सुरुवात केली. 

आज देविदास यांच्याकडे ३ एकर क्षेत्रावर ५×२ अंतरावर तुती असून सोबत रेशीम कोष साठी दोन शेड आहेत. ज्यात वार्षिक एक-दोन महिने वगळता महिन्याला २५ दिवसांची एक बॅच याप्रमाणे ते घेऊ शकतात मात्र वातावरणीय बदल आणि तुतीची वाढ लक्षात घेता ते वार्षिक सरासरी ८ - १० बॅच काढतात. 

एका बॅच मधून मिळणारे उत्पन्न 
रेडिमेड अंडीपुंज द्वारे रेशीम कोष उत्पादन घेत असल्याने देविदास यांची एक बॅच अवघ्या २५ ते २८ दिवसांत निघते. एकरी १५० अंडीपुंज म्हणजेच जवळपास ९७५०० रेशीम अळीपासून एका बॅच मधून सरासरी १२० ते १४० किलो रेशीम कोष मिळतो ज्याला ३०० ते ५०० असा लिलावात दर मिळतो ज्यातून ६० ते ६५ हजार एवढे उत्पन्न एका बॅच मधून मिळते. 

चॉकी सेंटर द्वारे अंडीपुंजची विक्री 
देविदास हे जालना येथील एका खाजगी कंपनीच्या ग्रेनेज केंद्राद्वारे अंडीपुंज मागवतात व त्याची वाढ करून ते परिसरातील रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना घरपोहच पुरवितात. दहा दिवस अंडीपुंजाची ते विशेष काळजी घेतात. घरातच यासाठी त्यांनी विविध यंत्राद्वारे आर्द्रता नियंत्रित केली असून यातून देखील वार्षिक त्यांना सरासरी ३ ते ४ लाख रुपये उत्पन्न मिळते. 

घरातील सर्वांची मदत मोलाची 
देविदास सांगतात की, रेशीम शेतीत घरातील सर्वांची मदत फार महत्वाची असते. तुतीची कापणी ते अळ्यांना वेळेवर खायला टाकणे यात वेळेचे बंधन असते. त्या वेळेत तुती त्यांना देणे गरजेचे असून त्यासोबत शेड मधील वातावरण स्थिर ठेवावे लागते. अळ्यांना वातावरणीय बदलातील सहनशीलता कमी आहे. ज्यामुळे अश्या बदलांना त्या सहन करत नाही आणि परिणामी त्या मरण पावतात. 

Web Title: splitting the ancestral onion farmer made successful sericulture chhatrapati sambhajinagar vaijapur farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.