Join us

पारंपरिक शेतीला फाटा देत भराडखेड्याच्या भाऊसाहेबांनी घेतली फलोत्पादनात झेप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 4:02 PM

भराडखेड्यातील भाऊसाहेब घुगे हे दरवर्षी नवनवीन प्रयोग करतात. त्यामुळेच सुरवातीला त्यांनी  केशर आंब्याची लागवड केली होती. सेंद्रीय पध्दतीचा वापर करण्याचा निर्धार त्यांनी लागवड करतानाच केला होता. यानंतरच इस्त्रायल पध्दतीने केशर आंब्याची लागवड केली.

उत्पादन वाढीसाठी पारंपरिक शेती पध्दतीचा उपयोग नाही तर शेतकर्‍यांनी प्रयोगशील असणे गरजेचे आहे. शेती व्यवसायाला सुरवात करतानाच एकनाथ  घुगे यांनी हे सूत्र अंमलात आणले होते. त्यामुळेच त्यांनी पारंपरिक शेती पध्दतीला फाटा देत फलोत्पादन क्षेत्रात भरारी घेतली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आता फळबागांकडे वळणे गरजेचे आहे. फळबागेमध्ये आंबा हा अति घन लागवड पद्धतीने केल्यास फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना एकरी आर्थिक लाभ होईल, असे  सांगतात.

आंब्याचे मूळ उगमस्थानच भारत असून, एकूण जागतिक उत्पादनाच्या पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आंबा भारतात पिकतो. भारताव्यतिरिक्त मेक्सिको, ब्राझील, चीन, फिलिपिन्स, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इस्राईल अशा अनेक देशांमध्ये आंबा उत्पादन होते. एकूण लागवडक्षेत्रामध्ये भारत आघाडीवर असला तरी भारताची हेक्टरी आंबा उत्पादकता (हे. ८ टन) अत्यंत कमी असून, तुलनेत दक्षिण आफ्रिका (४० टन), इस्राईल (३५ टन) आघाडीवर आहेत. त्यातही महाराष्ट्राची उत्पादकता सव्वाचार टन इतकीच आहे. आपल्याकडील कोरड्या व उष्ण हवामानात फळांचा आकार थोडा लहान राहत असला, तरी त्यातील गोडी म्हणजे साखर व आम्लतेचे (Ratio) गुणोत्तर चांगले राहते. परिणामी फळांना सुगंध चांगला येतो. आपल्या फळांची टिकवण क्षमता जास्त राहते .

बदनापूर तालुक्यातील भराडखेडा येथील भाऊसाहेब घुगे हे एकत्रित कुटुंबातील तिन भावातील मोठे बंधू. भाऊसाहेब एकनाथराव  घुगे हे व्यवसायाने शासकीय कंत्राटदार , तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून शेतकरी प्रतिनिधी आहेत. भराडखेडा सह अन्य ठिकाणी त्यांची एकूण 45 एकर शेती आहे. यामधे केशर आंबा हे त्यांचे प्रमुख पिक असून नाथ फार्म्स या नावाने प्रसिद्ध आहे. त्यांनी आपल्या शेतात अति आधुनिक अशा अतिघन लागवड केसर आंबा बाग तसेच बहाडोली जांभूळ, खजूर आणि मोसंबी  या पिकाची लागवड केली .

अपवाद वगळता मराठवाड्यातील शेतकरी हे नवनवीन प्रयोग करण्यास धजावत नाहीत. केवळ रब्बी आणि खरीप हंगामावरच शेतकऱ्यांचा भर असतो. पण भराडखेड्यातील भाऊसाहेब घुगे हे दरवर्षी नवनवीन प्रयोग करतात. त्यामुळेच सुरवातीला त्यांनी  केशर आंब्याची लागवड केली होती. सेंद्रीय पध्दतीचा वापर करण्याचा निर्धार त्यांनी लागवड करतानाच केला होता. यानंतरच इस्त्रायल पध्दतीने केशर आंब्याची लागवड केली. लागवडीपासून जोपासणा आणि योग्य व्यवस्थापन यामुळे घुगे यांच्या शेतामध्ये आता आंबे लगडले आहेत.

भाऊसाहेब घुगे यांच्या नाथ फार्म्स ची वैशिष्टे 1.केशर आंबा तीन हजार झाडे वर्ष पाच पूर्ण यावर्षीच्या अंदाजे उत्पादन 30 टन 2.बहरी जातीचे खजूर झाडांची संख्या 400 अंतर  25 बाय 25 झाडांचे वय तीन वर्ष यावर्षी उत्पादनाला सुरुवात3.बालानगर सिताफळ 1000 झाडे झाडांचे वय सात वर्ष . 4.दोन शेततळे तलवावरून विहीर ठिबक सिंचन दारे पाण्याची व्यवस्था 5.कोकण बहाडोली जातीचे 1000 जांभळाचे झाडे झाडांचे वय सहावे वर्ष मागील वर्षीपासून उत्पादनाला सुरुवात यावर्षी संभाव्य उत्पादन प्रत्येक झाडाला कमीत कमी 25 किलो जांभळाचा दर दोनशे रुपये प्रति किलो मिळण्याची शक्यता 6.संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने बागाचे नियोजन 7.उन्हाळ्यामध्ये सन बर्निंग होऊ नये म्हणून आंब्याला कागदाच्या पिशवीचे कव्हरिंग करण्यात येते त्यामुळे उच्च दर्जाचा आंबा तयार होतो व कलर चांगला येतो 8.एक कोटी लिटरचे दोन शे ततळे आहेत

लागवड पद्धत  आंबा  , पेरू , सीताफळ मोसंबी जांभूळ यासारख्या सर्व फळ पिकांची लागवड उत्तर- दक्षिण सरळ रेषेत बेडवर केली आहे. त्यामुळे संपूर्ण झाडांना पूर्व-पश्चिम दिशेने सूर्यप्रकाश मिळतो. आंबा बागेत कांदा व मोहरी या पिकांची दोन्ही बेडच्या मधल्या अंतरात लागवड केली जाते. आंतरपिकांमुळे मधमाशांची संख्या  वाढून परागीभवन आणि उत्पादन वाढीसाठी फायदा  होतोय

 पेपर बॅगिंगमुळे फळांचे संरक्षण आंबा फळांचे तीव्र सूर्यकिरणांमुळे नुकसान (सन बर्निंग) होऊ नये यासाठी लिंबाच्या आकाराची फळे झाली, की त्यांना पेपर लावण्याचे तंत्र वापरण्यास सुरुवात केली आहे. जुन्या झाडांमध्ये प्रति झाड २०० ते ३०० तर सघन लागवडीत प्रति झाड २० ते २५ बॅग्ज लावण्यात येतात. प्रति बॅग किंमत अडीच रुपये आहे. या प्रयोगामुळे फळाची चकाकी, रंग दर्जेदार होऊन त्यास चांगली किंमत मिळते.

मत्स्य  शेती चा अवलंब शेततळ्यात राहू व कटला यांचे मत्स्यपालन करून त्याद्वारे अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत तयार केला आहे. बागेला अधिकाधिक सेंद्रिय पद्धतीने खत व्यवस्थापन केले जाते. त्यामध्ये शेणखत, गांडूळ खत, जिवामृतयांचा वापर केला जातो. सेंद्रिय स्लरी फळझाडांना दिली जाते. झाडाची उंची पाच ते सात फूट व कॅनोपीही सुयोग्य ठेवण्यात येते. सघन पद्धतीच्या आंबा बागेत कांदा हे पीक घेऊन एकरी १० टनांपर्यंत उत्पादन घेतले आहे.

 यांत्रिकी कारणाचा वापररोटर, बेड तयार करणे यासाठी यंत्राचा वापर केला जातो. फवारणीसाठी ब्लोअरची व्यवस्था आहे. २० एचपी व ४५ एचपी क्षमता असे दोन ट्रॅक्टर्स आहेत.

 सिंचन सुविधादोन सामुहिक शेत तळ्याच्या माध्यमातून पाणी साठा . संपूर्ण क्षेत्रावर ठिबक सिंचनाचा वापर

उत्पन्न १.केशर आंबा - 5 वर्ष वयाची 3000 झाडे उत्पादन 30 टन. सरासरी बाजार भाव 150-2 00 रू किलो. 2. ब्राझिल सिडलेस मोसंबी 1000झाडे उत्पादन 35 टन भाव 40 रू प्रती टन 3. सिताफळ झाडे 1000 रू वार्षिक उत्पन्न 5 लाख. 4. सहा वर्ष वयाची कोकण बहाडोली जांभूळ 1000 झाडे  प्रती झाड 25 किलो उत्पादन अपेक्षित ,बाजारभाव 200 रू किलो  मिळण्याची अपेक्षा. 

-दत्तात्रय शेषराव सूर्यवंशी सहायक  तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय जालना

टॅग्स :आंबाशेतकरीशेती क्षेत्र