नीलेश जोशी
बुलढाणा : पश्चिम विदर्भातीलशेतकरी हवामान बदल, पारंपरिक शेतीतील अडचणी आणि बाजारपेठेतील अस्थिरता यांसारख्या आव्हानांना सामोरे जात शेती व्यवसाय टिकवून ठेवत आहेत.(Success Story)
मात्र, योग्य मार्गदर्शन, आधुनिक तंत्रज्ञान आणि थेट बाजारपेठेची जोड मिळाल्यास शेती अधिक फायदेशीर होऊ शकते.हेच लक्षात घेऊन परशराम आखरे, डॉ. अमित देशमुख आणि वैभव घरड या तिघांनी 'कृषी सारथी' या स्टार्टअपची स्थापना केली.
केवळ अडीच लाख रुपयांच्या भांडवलावर सुरू झालेल्या या उपक्रमाने अवघ्या चार वर्षात ५ कोटी रुपयांच्या उलाढालीचा टप्पा गाठला आहे, तसेच १८० युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.(Success Story)
शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्याचा नवा मार्ग
शेतीतील वाढत्या समस्या, दलालांचे शोषण आणि बाजारपेठेतील मर्यादा ओलांडण्यासाठी 'कृषी सारथी'ने प्रभावी उपाय योजले. आजपर्यंत ३५,००० हून अधिक शेतकऱ्यांना आधुनिक शेतीच्या दिशेने मार्गदर्शन करून त्यांचा आर्थिक फायदा वाढवण्यास मदत केली आहे. यंदा हा उपक्रम ६ कोटी रुपयांच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. (Success Story)
तंत्रज्ञानाच्या मदतीने शाश्वत शेती
'कृषी सारथी' शेतकऱ्यांना २४ तासांत घरीच खते, बियाणे आणि कीटकनाशके पुरवतो. तसेच, बायोचार उत्पादनात मोठी झेप घेत पीक संरक्षणासाठी एआय आणि मशीन लर्निंगच्या मदतीने अत्याधुनिक उपाय विकसित करत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील १३ जिल्ह्यांत या उपक्रमाचा झपाट्याने विस्तार होत आहे. (Success Story)
अतिरिक्त आर्थिक लाभ
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी 'कृषी सारथी'ने आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी करार करून कार्बन क्रेडिट उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. यामुळे बागायती शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक लाभमिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.(Success Story)
शासकीय सन्मानाने गौरव
मोहदरी येथील परशराम आखरे यांनी क्राऊड फंडिंगच्या मदतीने शिक्षण पूर्ण केले. आयआयटी मुंबईच्या संशोधनाचा अनुभवामुळे त्यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान विकसित केले. नवोपक्रमामुळे महाराष्ट्र शासनाने २०२२ मध्ये 'उत्कृष्ट कृषी स्टार्टअप' म्हणून 'कृषी सारथी'ला सन्मानित केले.