Lokmat Agro >लै भारी > उजनीच्या काठावर स्ट्रॉबेरीची लागवड यशस्वी; सव्वा एकरात २० लाखांचे उत्पन्न अपेक्षित

उजनीच्या काठावर स्ट्रॉबेरीची लागवड यशस्वी; सव्वा एकरात २० लाखांचे उत्पन्न अपेक्षित

Successful planting of strawberries on the edge of Ujani dam; Expected income of 20 lakhs per quarter acre | उजनीच्या काठावर स्ट्रॉबेरीची लागवड यशस्वी; सव्वा एकरात २० लाखांचे उत्पन्न अपेक्षित

उजनीच्या काठावर स्ट्रॉबेरीची लागवड यशस्वी; सव्वा एकरात २० लाखांचे उत्पन्न अपेक्षित

उजनी धरणाच्या काठावरील बिटरगाव (वांगी) येथील दादासाहेब पाटील या शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीची सव्वा एकरात यशस्वी लागवड केली आहे.

उजनी धरणाच्या काठावरील बिटरगाव (वांगी) येथील दादासाहेब पाटील या शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीची सव्वा एकरात यशस्वी लागवड केली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

करमाळा (जि. सोलापूर) सोलापूर : जिल्ह्यातील हवामान स्ट्रॉबेरीसाठी प्रतिकूल असल्याने स्ट्रॉबेरीचे उत्पादन होऊ शकणार नाही, असा समज होता; परंतु हा समज चुकीचा ठरवत उजनी धरणाच्या काठावरील बिटरगाव (वांगी) येथील दादासाहेब पाटील या शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीची सव्वा एकरात यशस्वी लागवड केली आहे.

स्ट्रॉबेरीला पुणे व मुंबई येथील मॉलमध्ये चांगली मागणी असून, तीनशे रुपये किलो दर मिळत आहे. सव्वा एकरात २० लाखांचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज आहे.

केळी, ऊस शेतीमुळे वातावरण पोषक
पाटील यांनी महाबळेश्वरहून २५ हजार स्ट्रॉबेरीची रोपे मागवली. तीन बाय तीन फुटांवरती बेड काढण्यात आले. एका बेडवरती सहा रांगा आहेत. तर दोन बेडमधील अंतर ३ फूट आहे. एका स्ट्रॉबेरीच्या झाडाला एक ते दीड किलो स्ट्रॉबेरीचे उत्पन्न अपेक्षित आहे. शेतीच्या चारही बाजूने केळी व ऊस आहे. त्यामुळे षक वातावरण मिळाले. लवकरच स्प्रिंकलर बसविणार असल्याचे पाटील यानी सांगितले.

महाबळेश्वरचे मित्र वसंत भिलारे यांची स्ट्रॉबेरी शेती पाहण्यासाठी मी गेलो होतो. करमाळ्यात स्ट्रॉबेरी येईल का, असा प्रश्न मी त्यांना केला. तेव्हा त्यांनी ही स्ट्रॉबेरी तुमच्याकडेसुद्धा येईल, असे सांगितले. त्यानंतर स्ट्रॉबेरी लावण्याचा निर्णय घेतला. अडीच एकर शेतामध्ये स्ट्रॉबेरी लागवड केली. करमाळ्यासारख्या भागात स्ट्रॉबेरी उत्तमरीतीने पिकवू शकतो, याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. - दादासाहेब पाटील, कृषिभूषण, बिटरगाव (वांगी) ता. करमाळा

Web Title: Successful planting of strawberries on the edge of Ujani dam; Expected income of 20 lakhs per quarter acre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.