Lokmat Agro >लै भारी > भात शेतीच्या पट्ट्यात पॉलीहाऊसमधील फुलशेती वाढवतेय स्वातीची ख्याती

भात शेतीच्या पट्ट्यात पॉलीहाऊसमधील फुलशेती वाढवतेय स्वातीची ख्याती

Swati is increasing the popularity of floriculture in polyhouse in the rice farming belt | भात शेतीच्या पट्ट्यात पॉलीहाऊसमधील फुलशेती वाढवतेय स्वातीची ख्याती

भात शेतीच्या पट्ट्यात पॉलीहाऊसमधील फुलशेती वाढवतेय स्वातीची ख्याती

बालवडी (ता. भोर) येथील उच्च शिक्षित, प्रयोगशील युवा शेतकरी स्वाती किंद्रे यांनी नाटंबी येथे ३० गुंठे क्षेत्रामध्ये पॉलिहाऊस उभारून पारंपरिक शेतीला बगल देत पॉलीहाउस उभारून जरबेराचा मळा फूलविला आहे.

बालवडी (ता. भोर) येथील उच्च शिक्षित, प्रयोगशील युवा शेतकरी स्वाती किंद्रे यांनी नाटंबी येथे ३० गुंठे क्षेत्रामध्ये पॉलिहाऊस उभारून पारंपरिक शेतीला बगल देत पॉलीहाउस उभारून जरबेराचा मळा फूलविला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सूर्यकांत किंद्रे
शेतकरी फुलशेतीतून चांगले पैसे कमवू शकतात, फुलांबद्दल बोलायचे झाले तर सध्या जरबेरा फुलांची मागणी खूप वाढली आहे. या फुलाच्या लागवडीतून शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतात. हे फूल दिसायलाही अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे, त्यामुळे ते चांगल्या किमतीत विकले जाते.

बालवडी (ता. भोर) येथील उच्च शिक्षित, प्रयोगशील युवा शेतकरी स्वाती किंद्रे यांनी नाटंबी येथे ३० गुंठे क्षेत्रामध्ये पॉलिहाऊस उभारून पारंपरिक शेतीला बगल देत पॉलीहाउस उभारून जरबेराचा मळा फूलविला आहे, या शेतीमधून दररोज फुलांच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळत आहे. स्वाती किंद्रे यांनी शेतकऱ्यांसमोर चांगला आदर्श निर्माण केला आहे.

भाताची शेती म्हणून ख्याती असलेल्या या परिसरात रासायनिक खते, औषधे, योग्य तण नियंत्रण, पाणी व्यवस्थापन, बुरशीनाशक आणि किड नियंत्रण, सेंद्रिय जिवाणू खतांचा वापर करून नैसर्गिक पध्दतीने जरबेरा या नगदी पिकाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे पूर्व मशागतीमधे लाल माती, दीड टन भाताची तुस, २० ट्रॉली शेणखत मिसळले. ट्रॅक्टरने नांगरट करून रोटर मारला पाणी सोडण्यात आले.

त्यानंतर बेड तयार करण्यात आले. राईस अन साईन कंपनीचे १८ हजार रोपांची लागवड केली, बेसल डोसमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट १७ बॅग, निंबोळी पेंड ३० बॅग, स्टरामील ८ बॅग, बायोझॅम ग्रॅन्यूलस ३० किलो, थायमेट १५ किलो, मायक्रो न्यूट्रीयन १५ किलो, सल्फर ३० किलो, ह्युमिक दाणेदार ३० किलो, यारामील कॉम्प्लेक्स ३० किलोचा दिला. शेतीच्या मशागतीनंतर ७५ सेंमी रुदीचे ३० सेमी ते ४५ सेंमी उंचीचे गादी वाफे तयार करून त्यावर दोन रोपात ३० सेमी तर दोन ओळीत १० सेमी अंतर ठेवून झिकझ्याक पध्दतीने लागवड केली.

ठिबक सिंचनाद्वारे आठवड्यातून दोन वेळा खंताची मात्रा दिली जाते. ५० दिवसानंतर जरबेराच्या रोपाला कळी येण्यास सुरुवात झाली, रोपांची वाढ होण्याकरिता कळ्या खुडून टाकल्या. १२ आठवड्यांनी पहिली फुले काढणीस सुरुवात केली. सकाळी फुलांची काढणी करून काढलेली फुले स्वच्छ पाणी असलेल्या बादलीमध्ये ठेवून १० फुलांचा एक गठ्ठा याप्रमाणे गठ्ठे बनवून पुणे मार्केटला विक्री पाठवले जातात.

विशेष काळजी
फुलदांड्याच्या लांबी, दांड्याची जाडी, फुलाचा आकार, ताजेतवाने पणा यावर प्रतवारी उरते. त्यामुळे प्रतवारी करताना विशेष काळजी घ्यावी लागते. त्यानुसार दर ठरतो. त्यामुळे प्रतवारीची फुले निवडुन गड्डी तयार करावी लागते. एक फुल जरी खराब असेल तर त्याचा दरावर परिणाम होतो. जरबेराची फुले रोज ३०० गड्डी पुणे मार्केट पाठवली जाते. साधरणता २० रुपयांपासून ९० रुपयांपर्यंत गड्डीला भाव मिळतो. शेतीची आवड असल्याने पारंपारिक शेती न करता आधुनिक शेतीकडे लक्ष केंद्रीत केले.

रोग नियंत्रण
रोग नियंत्रणासाठी विविध कीटकनाशक फवारणी आठवड्यातून दोन वेळा कीटक आणि रोग नियंत्रणासाठी विविध कीटकनाशके आणि बुरशीनाशक व टॉनीकचा वापर केला. किड नियंत्रण ठेवण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा २०० मिली प्रमाणे ओमाईट, पेगासेस, निमज्ञॉल, स्टिकर, रोगर, इंडेक्स, बायो ३०३, सल्फर ओबेरॉन, कुनोची या किड नियंत्रकाचा वापर केला. तसेच तण नियंत्रणासाठी खुरपणी दर पंधरा दिवसानी केली जाते.

Web Title: Swati is increasing the popularity of floriculture in polyhouse in the rice farming belt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.