मेहरून नाकाडे
रत्नागिरी: व्यवसायाने डॉक्टर असलेले नरवण (गुहागर) येथील डॉ. अनिल जोशी शेतीत विविध प्रयोग करत आहेत. ८० एकर क्षेत्रावर त्यांनी बागायती फुलवली आहे.
त्यामध्ये ते आंबा, काजू, नारळ, सुपारी, काळीमिरी, जायफळ, केळीची लागवड करून उत्पादन घेत आहेत. रुग्णसेवा करत असतानाच ते लाल मातीची सेवा करत आहेत.
शेती करत असताना व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला तर ती नक्की यशस्वी होते, हे त्यांनी सिद्ध केले आहे. आंबा उत्पादन घेत असताना त्यांनी ५०-५० चे तंत्र जोपासले आहे.
सुरुवातीला बाजारात आवक कमी असल्याने आंब्याला दर चांगला मिळतो. त्यामुळे ५० टक्के आंबा बाजारात विक्रीसाठी पाठवतात तर उर्वरित ५० टक्के आंबा स्वतः खासगी विक्री करतात. थेट विक्रीचा त्यांना फायदा होत आहे.
विविध पुरस्कार रुग्णसेवेसह शेतीशी
डॉ. जोशी यांची नाळ जोडली आहे. सामाजिक कार्यातही ते अग्रेसर आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत विविध पुरस्काराने डॉ. जोशी यांना सन्मानित करण्यात आले आहे. पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार हायटेक पुरस्कार, जिल्हा परिषदेतर्फे आदर्श शेतकरी पुरस्कार त्यांनी मिळविला आहे. शेतकऱ्यांना ते स्वतः मार्गदर्शनही करत असतात.
अधिक वाचा: पाटलांनी केला विक्रम; खडकाळ जमिनीत एकरामध्ये काढले १२० टन ऊस उत्पादन