शेतीत राबताना शेतकर्यांनी नवनवीन प्रयोग केल्यास नक्कीच यश प्राप्त होते याचे उत्तम उदाहरण सध्या अमरावती जिल्ह्यात बघावयास मिळत आहे. टरबूजचे नवखे असलेले पीकदेखील युवा शेतकऱ्याला बंपर उत्पन्न देऊन गेले आहे. वरूड तालुक्यातील नांदगाव (लोणी) येथील शेतकऱ्याने हे यश मिळविले असून दीड एकरात या शेतकर्याला साडेचार लाखांचे उत्पन्न झाले आहे.
नांदगाव (लोणी) येथील युवा शेतकरी किशोर चोरोडे यांनी अवघ्या दीड एकरात अवघ्या सत्तर दिवसांत साडेचार लाखांचे पीक घेतले. उच्च शिक्षित विज्ञान पदवीधर असलेले किशोर चोरोडे यांनी नांदगाव ते आलोडा रस्त्यावर असलेल्या सहा एकर शेतातील दीड एकर क्षेत्रात पहिल्यांदाच टरबूज, तर दीड एकरात खरबूजची लागवड केली.
शेतीपूरक हा जोडधंदा करेल मालामाल; वराह पालनात मोठ्या संधी
तर त्यांच्या शेतातील उर्वरित जागेत त्यांनी संत्रा लागवड केलेली आहे. चोरोडे यांच्याकडील एका झाडास ३० ते ४० टरबूज फळे लागलेली होती. प्रतिफळ हे २.५ ते ४ किलोपर्यंत वजनाची होती. पहिल्याच वेळी त्यांना ४७ मेट्रिक टन उत्पादन यातून मिळाले.
यांस ११ हजार ७५० रुपये प्रतिटन दराने कोलकाता येथील व्यापाऱ्यांनी थेट शेतात येऊन खरेदी केले. दीड एकरात खर्च वजा जाता साडेचार लाख निव्वळ नफा त्यांना या टरबूज शेती प्रयोगातून मिळाले आहे.