पोपटराव मुळीकइंदापूर तालुक्यात पेरू लागवडीला शेतकऱ्यांनी जादा प्राधान्य दिले आहे. पेरूला जेवढा खर्च करावा तेवढे जादा उत्पादन निघते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे जरी हयगय झाली तरीही ते पीक पदरात पडते. यामुळे या भागातील शेतकरी विविध प्रकारच्या फळबाग लागवडीकडे वळला असल्याचे दिसून आहे.
इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील अमर बोराटे दहा वर्ष शिक्षक म्हणून अगदी तोकडधा पगारामध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करत होते. परंतु या पगारावर समाधान होत नसल्याने २०१० साली शेतात डाळिंब पिकाची लागवड केली.
त्यातून भरघोस उत्पादन घेऊन आपल्या नोकरीला पूर्णविराम दिला, तेव्हापासून आपल्या वडिलोपार्जित दहा एकर क्षेत्रामध्ये फळबागाची लागवड करतात. यामध्ये बोराटे यांनी आपल्या शेतात पेरूची ६० गुंठे लागवड केली. या क्षेत्रामध्ये दहा ते बारा लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे.
येथील अमर बोराटे यांनी आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून तसेच बीएड करून गावाजवळील एका खाजगी संस्थेमध्ये शिक्षक म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली परंतु दहा वर्ष शिक्षक या पदावर काम करून देखील त्यांना मिळणाऱ्या तोकड्या पगारावर बोराटे यांचे समाधान होत नव्हते.
तब्बल दहा वर्षे शिक्षक म्हणून काम केल्यानंतर बोराटे यांनी आपल्या दहा एकर क्षेत्रामध्ये कष्ट करण्याचे ठरविले आपल्या क्षेत्रातील सुरुवातीला एक एकर क्षेत्रामध्ये डाळिंबाची बाग लावून त्या डाळिंब या पिकातून बोराटे यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले.
तेव्हापासून बोराटे यांनी नोकरीला पूर्णतिराम देत आपला पूर्ण वेळ शेतीसाठी देण्याचे ठरवले आणि तेव्हापासून बोराटे यांचे वडील वडिलोपार्जित दहा एकर क्षेत्रामध्ये तीन एकर पेरू पाच एकर डाळिंब आणि दोन एकर द्राक्ष असे एकूण दहा एकर क्षेत्रामध्ये फळबागाची लागवड केली आहे.
बोराटे यांनी आपल्या ६० गुंठे क्षेत्रामध्ये व्हीएनआर जातीचा पेरूची लागवड केली. या ६० गुंठे क्षेत्रात एकूण ६६० झाडांची लागवड केली आहे. या क्षेत्रातील पेरूचे हे सहावे पीक आहे. आज या झाडावर १४५ ते १५५ फळे आहेत. प्रत्येक फळाला उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून फोम लावण्यात आला आहे.
पूर्णवेळ शेतीमध्ये घातलादहा वर्षे शिक्षक म्हणून नोकरी केली. अत्यंत कमी पगार होता. तरीही आपल्या करिअरची सुरुवात आहे म्हणून दहा वर्षे शिक्षक म्हणून काम केले. परंतु पुढे जाऊन शेतीला लागणारे भांडवल आणि घर खर्च भागत नसल्याने बोराटे यांनी शिक्षक पदाचा राजीनामा देऊन पूर्णवेळ शेतीमध्ये घातला, आज बोराडे यांची दहा एकर फळबाग आहे.
अधिक वाचा: दोन इंजिनीयरची जोडी जमली.. नोकरी सोडली अन् शेतीतील केळी दुबईला निर्यात केली