Join us

कोकणातील गिरणे गावच्या चवळीला अनोखी चव; ८० एकरांवर चवळी शेतीचा पॅटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 10:03 AM

तळा तालुक्यातील गिरणे हे गाव इंदापूर, विरजोली, भालगाव, मुरुड व म्हसळा परिसरात चवळीसाठी प्रसिद्ध असणारे गाव आहे.इतर ठिकाणच्या चवळीपेक्षा वेगळी चव असणारी चवळी अशी ख्याती येथील चवळीची आहे.

दव आणि जमिनीच्या ओलाव्यावर गिरणे परिसरात तयार होणाऱ्या कडधान्याला जिल्हाभरातून चांगली मागणी आहे. तळा तालुक्यातील गिरणे हे गाव इंदापूर, विरजोली, भालगाव, मुरुड व म्हसळा परिसरात चवळीसाठी प्रसिद्ध असणारे गाव आहे. या गावात पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने चवळीचे पीक घेतले जात आहे.

यावर्षी अंदाजे ८० एकरांवर शेतीमध्ये गिरणे गावातील शेतकऱ्यांनी चवळीची लागवड केली आहे. इतर ठिकाणच्या चवळीपेक्षा वेगळी चव असणारी चवळी अशी ख्याती येथील चवळीची आहे. हे गाव खाडीकिनारी असल्याने खाडीवजा वरकस जमिनीत या चवळीची लागवड केली जाते. येथील मेहनती शेतकरी चवळीबरोबरच वाल, मूग व तुरीची शेतीसुद्धा करतात. त्यामुळे चवळीच्या पिकाला हे पूरक पीक ठरत आहे.

नोव्हेंबर, डिसेंबरला पेरणीयेथील शेतकऱ्यांशी चवळीच्या शेतीविषयी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, आम्ही पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये शेतीची नांगरणी करून त्यात काही प्रमाणात शेणखत टाकून मग चवळीची लागवड केली जाते.

अधिक वाचा: रशियन झाले फिदा; आटपाडीच्या डाळिंबाचा सातासमुद्रापार डंका

पोषक वातावरणामुळे चांगले पीक• येथील शेतकरी चवळीपासून जास्तीत जास्त ४० हजार ते कमीत कमी १० हजारपर्यंत उत्पन्न घेत आहेत. अनेक शेतकरी ५० किलोच्या वर वालाचे पीकही घेतात तर काही शेतकरी तूर, मूग, मटकीचेही पीक घेत आहेत. • गिरणे गावाला लाभलेली खाडी व वरकस जमीन त्या जमिनीत चवळीसाठी असणारे पोषक वातावरण यामुळे येथे चवळीचे पीक जोमाने येत असून हे गाव पूर्वीपासून चवळीसाठी प्रसिद्ध झाले आहे.

कृषी अधिकाऱ्यांचेही मार्गदर्शन• पहिला बहर काढल्यानंतर पुन्हा शेंगा लागतील व दुसरा बहर काढला जाईल. या शेंगा पूर्ण पिकल्यानंतर काढून त्या उन्हात सुकवून त्यातून चवळी काढली जाते.• अनेक वेळा कृषी अधिकाऱ्यांचेही शेतकरी मार्गदर्शन घेतात. या पिकाला योग्य प्रमाणात कीटकनाशके, खत मारतात तर काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीनेच शेती करतात.• एका एकरात अडीच ते तीन क्विटल चवळी पीक होते. येथील शेतकरी जास्तीत जास्त पाच क्विंटलपर्यंत चवळीचे पीक घेतो. या चवळीच्या पिकामुळे चांगले उत्पन्न येथील शेतकऱ्यांना मिळत आहे.

टॅग्स :शेतकरीशेतीकोकणभाज्यातूरमूगपीक