उमेश धुमाळ
कमी कालावधीतील पिके वर्षभर टप्प्याटप्प्याने घेण्याने दरांची जोखीम कमी होते. त्याच दृष्टीने फरसबी (फ्रेंच बीन) हे पीक मी वर्षभर घेतो. घरचे अर्थकारण सक्षम करण्यास हेच पीक कारणीभूत ठरले.
आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी येथील प्रयोगशील शेतकरी मुरलीधर सिनलकर व शेवंता सिनलकर या दापंत्याने आपल्या २५ गुंठे शेतात बीन्स या वेल जातीच्या फरसबी ची लागवड केली असुन भरघोस उत्पादन काढले आहे.
तोड्याला २०० किलो फरसबी निघत असुन बाजारपेठेत २५ ते ३० रुपये किलोला भाव मिळत आहे. चार ते पाच दिवसांनंतर तोडा होत असुन जवळपास खर्च वजा जाता दोन ते अडीच लाख नफा मिळेल असे शेतकरी संजय थोरात सांगतात.
आंबेगाव तालुक्यातील पूर्वभागातील लोणी धामणी हा पट्टा दुष्काळी भाग आहे. उन्हाळ्यात तर कोरड्या ठणठणीत या भागातील विहीरी पाहायला मिळतात. अशाही परिस्थितीत येथील शेतकरी थोड्या फार पाण्यात ठिबक सिंचनाचा वापर करून पिके काढताना पहावयास मिळतात.
गेली २० वर्षापासून येथील लोकप्रतिनिधी या भागाला आम्हीच पाणी देऊ असे म्हणत येथील शेतकऱ्याची दिशाभूल करत आहे. म्हाळसाकांत सिंचन योजना तर कागदावरच अस्तित्वात आहे. गेली वीस पंचवीस वर्षात पुढे सरकलीच नाही. आणि येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत त्याचा काही बोलबालाही दिसत नाही. कोणत्याच पक्षातील नेते यावर बोलायला तयार नाही एकूणच येथिल सिंचन योजनेचा राजकारणासाठी बडेजाव केल्याचे पहायला मिळतं आहे.
कमी कालावधीतील पिके वर्षभर टप्प्याटप्प्याने घेण्याने दरांची जोखीम कमी होते. त्याच दृष्टीने फरसबी (फ्रेंच बीन) हे पीक मी वर्षभर घेतो. घरचे अर्थकारण सक्षम करण्यास हेच पीक कारणीभूत ठरले. या पिकाला तशी बाराही महिने मागणी असते.
मात्र गणपती, दसरा, दिवाळी व पुढे लग्नसराई अशा काळात ही मागणी अधिक असते. पावसाळा दिवसांत मागणी कमी. गर असलेल्या, कोवळ्या, मध्यम आकाराच्या शेंगांना जास्त मागणी असते. हिवाळ्यातील लागवडीचे उत्पादन १५ टनांपर्यंतही जाते.
हंगाम व लागवड नियोजन कसे केले जाते?
• वर्षभर हे पीक घेण्यात येते. दर महिन्याला एक एकर असे क्षेत्र लागवडीखाली असते.
• वाणनिहाय सुमारे सहा महिन्यांचा पिकाचा कालावधी.
• ५० दिवसांनंतर उत्पादनास सुरुवात.
• साधारण तीन बहार घेता येतात.
• एक मजूर दिवसभरात ४५ किलो शेंगांची काढणी करतात.
• करपा आणि नागअळीचा प्रादुर्भाव होतो.
• साडेचार फुटी बेडचा वापर, पॉली मल्चिंगचा वापर.
• एकरी कोंबडी खत दोन टन तर गांडूळ खत ६०० किलो असा वापर.
• गोमूत्र, जैविक खताच्या वापरावर भर.
• फरसबी घेण्यासाठी पाण्याची शाश्वती हवी. पाणी कमी पडल्यास वाढ व उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.
अधिक वाचा: माळरानावरील खट्टा-मिठ्या अंजीराची कहाणी; शेतकऱ्याची अंजीररत्न पुरस्कारासाठी वर्णी