विकास शहा
बिऊर-शांतीनगर (ता.शिराळा) येथील प्रयोगशील महिला शेतकरी राजश्री वसंतराव पाटील व त्यांची सुनील व बाबू या दोन्ही मुलांनी माळरानावरील ऊसात वांग्याचे आंतरपिक घेऊन १८ गुंठ्यात दोन महिन्यात अडीच टन उत्पादन काढून तब्बल सव्वा लाखाचे उत्पन्न काढून आदर्श निर्माण केला आहे. आंतरपिक व ऊस पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.
अल्प भुधारक व शेतीवर उदरनिर्वाह असणारे शेतकरी पैसा मिळवून देणाऱ्या पिकाकडे वळत आसून नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. अलिकडच्या काही वर्षापासून शेतकरी ऊसामध्ये आंतरपिक घेण्याकडे कलवाढलेला पहावयास मिळत आहे. दोन्हीही हंगामात शेतकरी ऊसात आंतरपिके घेत आहेत व दुहेरी फायदा कसा होईल याकडे वळला आहे.
पाटील यांनी १५ सप्टेंबरला कांडी पद्धतीने ऊसाची लागण केली होती. जमीन पोटापुरती असल्यामुळे प्रपंचाला थोडासा हातभार लागेल म्हणून लागणीनंतर दहा दिवसांनी आंतरपिक म्हणून त्रिशुल वाणाची वांगी लावायचे ठरवले. त्याप्रमाणे या वाणाची लागण केली होती.
लावणीच्या आगोदर गावखत टाकले होते. त्यानंतर तंत्रज्ञानाची जोड देऊन सेंद्रिय खत व जीवाणू खताचा वापर केला होती. गावखताचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याने परिणामी ऊसाचीही लागण व वांगी दोन्हीही पिके चांगली आली.
पाण्याचे योग्य नियोजन वेळेवर आंतरमशागत किटकनाकांचा वापर केल्याने वांगी जोमात आली. पोषक वातावरणामुळे वांगी चांगलीच बहरली पहिल्या तोड्यापासून प्रतिदीनी जवळपास ६० ते ७० किलो उत्पादन निघत आहे तसेच ६० ते ७० रुपये दर मिळत असून दरवाढीचाही चांगलाच फायदा झाला.
सध्या सरासरी ४० रुपयाने प्रतिकिलो दर मिळत आहे. आजवर रोज निघणारे उत्पादन व्यापाऱ्यांना न देता जोडीला दोन महिला मजूरांना बरोबर घेऊन आठवडा बाजारात स्वतः विक्री करतात. दोन महिन्यात जवळपास अडीच टन माल निघाला असून सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न आज अखेर झाले असून अजूनही दोन महिने उत्पादन निघेल असे जयश्री पाटील यांचे मत आहे.
यावर्षी पाऊस कमी झाला खरीप हंगामातील पिकासह ऊस पिंकाना याचा फटका बसला होता. मात्र रात्रीचा दिवस करुन व योग्य नियोजनामुळे मातीत सोनेही पिकते याचा आदर्श जयश्री पाटील यांनी निर्माण केला आहे.
आम्ही त्रिशुल वाणाची वांगी लावायचे ठरवले. त्याप्रमाणे या वाणाची लागण केली लावणीच्या आगोदर गावखत टाकले होते. त्यानंतर तंत्रज्ञानाची जोड देऊन सेंद्रिय खत व जीवाणू खताचा वापर केला होती. गावखताचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याने परिणामी ऊसाचीही लागण व वांगी दोन्हीही पिके चांगली आली. - राजश्री पाटील, शेतकरी, बिऊर