पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमार्फत उस शेतीत भरीव कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कारखाने आणि शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान केले जातात. तर यंदा राज्यातील सर्वांत जास्त उसाचे उत्पन्न घेणाऱ्या महिला शेतकरी विमल चौगुले या उसभूषण पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. त्या कोल्हापूर येथील शेतकरी असून काल पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमध्ये त्यांना कै. यशवंतराव चव्हाण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दरम्यान, विमल चौगुले या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील मजरेवारी येथील शेतकरी आहेत. त्यांनी सप्टेंबर २०२१ च्या पहिल्या आठवड्यात लागवड केली होती. शेतीत योग्य व्यवस्थापन आणि जास्तीत जास्त सेंद्रीय खतांचा वापर केल्यामुळे नक्कीच शेतीमधून चांगले उत्पन्न काढू शकतो हे विमल चौगुले यांनी प्रत्यक्षपणे दाखवून दिलं आहे. त्याचबरोबर पिकांना पोषक अन्नद्रव्ये मिळण्यासाठी ते दरवर्षी पिकांची फेरपालट करतात. केळी आणि मिरचीची बेवड उस पिकासाठी फायद्याची ठरते असं विमल चौगुले यांनी सांगितलं आहे.
खत व्यवस्थापन
रसायनिक खतांचा वापर टाळून चौगुले यांच्या शेतात जास्तीत जास्त सेंद्रीय खतांचा वापर केला जातो. त्यांच्या घरी जनावरे असल्यामुळे त्यांना शेणखत उपलब्ध होते. त्याचबरोबर शेतातील पालापाचोळा आणि उसाचे पाचटही शेतातच कुजवले जाते त्यामुळे मातीतील सेंद्रीय कर्ब वाढण्यास मदत होते. माती परिक्षण करून मातीत कोणते अन्नद्रव्ये कमी आहेत हे तपासून त्यानुसार खते व्यवस्थापन केले जाते.
पाणी व्यवस्थापन
चौगुले यांच्या शेतात पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले जाते. उस शेतीत पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला जातो. तर खते सोडण्यासाठीसुद्धा ठिबक सिंचनाचाच वापर केला जातो. पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे उसाची वाढ चांगली झाली असं विमल चौगुले सांगतात.
पुरस्कार आणि पुरस्कार जाहीर झालेल्या शेतकऱ्यांची नावे खालीलप्रमाणे
विभागवार उसभूषण पुरस्कार
मध्य विभाग
१) विजय लोकरे
२)सुनिल काकडे
३) सुरेश आवारे
उत्तरपूर्व विभाग
१) (एकही शेतकरी यासाठी पात्र झाला नाही)
२) (एकही शेतकरी यासाठी पात्र झाला नाही)
३) भैरवनाथ सवासे
राज्यस्तरीय उसभूषण पुरस्कार
१) कै. यशवंतराव चव्हाण पुरस्कार - विमल चौगुले (कोल्हापूर)
२) कै. वसंतराव नाईक पुरस्कार - पोपट महाबरे (जुन्नर, पुणे)
३) कै. अण्णासाहेब शिंदे पुरस्कार - अनिकेत बावकर (मुळशी, पुणे)
वैयक्तिक पुरस्कार
१) उत्कृष्ट पर्यावरण अधिकारी - दिपा भंडारे (श्रीदत्ता साखर कारखाना शिरोळ, कोल्हापूर)
२) उत्कृष्ठ आसवनी व्यवस्थापक - दत्तात्रय वारे-चव्हाण (सुंदरराव सोळंके साखर कारखाना, धारूर, बीड)
३) उत्कृष्ट फायनान्स मॅनेजर - रविंद्र काकडे (सुधाकरपंत परिचारिक पांडुरंग कारखाना, माळशिरस)
४) उत्कृष्ठ शेती अधिकारी - प्रशांत कणसे (पतंगराव कदम सोनहिरा कारखाना, सांगली)
५) उत्कृष्ठ चीफ केमिस्ट - किरण पाटील (क्रांती अग्रणी कारखाना, सांगली)
६) उत्कृष्ठ चीफ इंजिनिअर - सुर्यकांत गोडसे (शंकरराव मोहिते पाटील कारखाना, माळशिरस)
७) उत्कृष्ठ कार्यकारी संचालक - राजेंद्र यादव (सोमेश्वर कारखाना, बारामती)
उत्कृष्ठ ऊस विकास संवर्धन पुरस्कार
१) दक्षिण विभाग - क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड साखर कारखाना, सांगली
२)मध्य विभाग - विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना, म्हाडा, सोलापूर
३) उत्तरपूर्व विभाग - अंकुशराव टोपे समर्थ कारखाना, अंबड, जालना
कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ठ साखर कारखाना पुरस्कार
१) छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना कागल जि. कोल्हापूर