गुणवत्ता, चव, विविध आकराच्या आकर्षक पॅकिंग आणि जोरदार ब्रंडिंगच्या जोरावर बाजार सावंगीच्या आदर्श डेअरीने आपल्या विविध दुग्धजन्य पदार्थांचा संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खप वाढविला आहे.
आजोबांच्या दूध संकलन केंद्रापासून सुरू झालेला प्रवास २००९ मध्ये दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्र या दुकानापर्यंत संदीप यांनी विस्तारला. सकाळ संध्याकाळ संकलन व इतर वेळेत डेअरी पदार्थ केंद्र सुरू असायचे. पुढे मात्र बाहेरचे हेच पदार्थ अवघ्या काही रुपयांच्या नफ्यासाठी न विकता आपण आपलेच पदार्थ बनवून विकू असा ध्यास संदीप यांनी केला.
यातून "आदर्श डेअरी" ची निर्मिती झाली. ज्यात सुरुवातील पनीर, दही, पेढा असे पदार्थ होते. व्यवस्थापनाची संपूर्ण धुरा पत्नी सौ रूपाली यांच्या कडे सोपवत संदीप यांनी वितरण व्यवस्था सांभाळली. आज हे नलावडे दांपत्य दूध प्रक्रिया उद्योगात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. पाचशे लिटर प्रती तास दूध प्रक्रिया क्षमतेची व्यवस्था सध्या नलावडे यांच्या कडे आहे. मात्र मागणी नुसार प्रती दिवस साधारण एक हजार ते बाराशे लिटर दुधावर प्रक्रिया केली जाते. स्वतः संकलन केलेले दूध व गरजेनुसार अधिक दूध यासाठी खरेदी केले जाते.
बाजार सावंगी तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील या आदर्श डेअरीत आज लस्सी, ताक, मसाला ताक, कंदी पेढा, बासुंदी, आम्रखंड, खवा, तुप, दही, श्रीखंड आदि पदार्थांची निर्मिती केली जाते. तसेच आगामी काळात आईस्क्रीम, कुल्फी आदी निर्मितीत नलावडे येत आहे. शेतीपूरक हा जोडधंदा करेल मालामाल; वराह पालनात मोठ्या संधीरूपालींच्या नेतृत्वाखाली महिलांच्या मदतीने चालतो कारभार
निर्मिती आणि पॅकिंग आदींसाठी परिसरातील काही महिलांना एकत्रित करून मागणीचा विचार करता सौ. रूपाली विविध पदार्थांची निर्मिती करतात. ज्यामुळे परिसरातील अनेक महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तसेच दैनंदिन व्यवस्थापनात देखील रूपाली आधिकाधिक जबाबदारी पार पाडतात. रूपालीच्या व्यवस्थापणामुळे आणि काटेकोर नियोजनामुळे मला तिथे अडकून न राहता विक्री व वितरण व्यवस्था अधिक चांगल्या पद्धतीने बघता येत असल्याचे संदीप आवर्जून सांगतात.
आदर्श डेअरीचा किती आहे उलाढाल
जवळपास २०० लोकांच्या समूहाकडून दूध खरेदी करून त्यावर प्रक्रिया केली जाते. ज्यासाठी वीज, मनुष्यबळ, वितरण, पॅकिंग, शीतकरण आदी खर्च येतो. यात जवळपास ५० लाखांची उलाढाल होते. वस्तु नुसार वेगवेगळे नफयांचे गणित असून सरासरी २५ % पर्यंत नफा हा विक्रीतुन मिळतो.