Lokmat Agro >लै भारी > Women Day Special: मजुरी करणाऱ्या लक्ष्मीने मेहनतीतून हळदीला दिला सोनेरी रंग

Women Day Special: मजुरी करणाऱ्या लक्ष्मीने मेहनतीतून हळदीला दिला सोनेरी रंग

Women farmer success story: Lakshmi, a laborer, gave turmeric a golden color through hard work | Women Day Special: मजुरी करणाऱ्या लक्ष्मीने मेहनतीतून हळदीला दिला सोनेरी रंग

Women Day Special: मजुरी करणाऱ्या लक्ष्मीने मेहनतीतून हळदीला दिला सोनेरी रंग

Women Day Special: हिंगोली जिल्ह्यातील उमरा येथे राहणाऱ्या लक्ष्मीबाई यांचा प्रेरणादायी प्रवास वाचू या सविस्तर.

Women Day Special: हिंगोली जिल्ह्यातील उमरा येथे राहणाऱ्या लक्ष्मीबाई यांचा प्रेरणादायी प्रवास वाचू या सविस्तर.

शेअर :

Join us
Join usNext

Women Day Special : बचत गटाच्या माध्यमातून आता घरोघरी स्वयंपाक घरात लक्ष्मीबाई च्या हळदीची चव पोचली आहे. आपल्या नावाला साजेशी कामगिरी करत हिंगोली जिल्ह्यातील उमरा येथील लक्ष्मीबाई यांनी हळदीला (Turmeric) सोनेरी चमक मिळवून दिली आहे.

प्रचंड मेहनत, जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर लक्ष्मीबाई यांनी हळद (Turmeric) शेतीचा मार्ग निवडला. त्यावरच न थांबता त्यांनी याच हळदीवर प्रक्रिया करून उद्योग निर्मिती केली आहे.

हळदीला आकर्षक पॅकिंग केले आणि आता हीच हळद (Turmeric) राज्यभरातील घरांमधील गृहिणींची पहिली पसंती ठरली आहे.

अप्रतिम असलेल्या हळदीमुळे आता गृहिणींचे भाजी आणि इतर पदार्थ अधिक चविष्ट होत आहेत. त्यामुळे लक्ष्मीबाईच्या 'दुर्गामाता महिला बचत गटा'ला आता हळदीच्या माध्यमातून नवीन ओळख मिळाली आहे. (Women farmer success story)

मजुरीतून सुरू झाला प्रवास

पी हळद हो गोरी... असे म्हटले जाते हळदीच्या वापरामुळे अनेक फायदे होताना दिसतात. मानवी शरीरावर हळदीमुळे चांगले परिणाम होतात. मात्र असाच हळदीच्या माध्यमातून मोठा फायदा लक्ष्मीबाई यांना झाला आहे. दुसऱ्यांच्या शेतात त्यांनी मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होत्या. परंतु, हे किती दिवस करणार हा प्रश्न त्यांना नेहमी सतावत होता. हा प्रवास सोपा नव्हता अनेक अडचणींना सामोरे जात त्यांनी केवळ इच्छाशक्तीच्या बळावर यश मिळवले. (Women farmer success story)

अन् काही तरी वेगळं करण्याचा विचार

दुसऱ्याच्या शेतात मजुरी करणाऱ्या लक्ष्मीबाईंना मजुरी करणे काही मान्य नव्हते. त्यामुळे त्यांना हा विचार अस्वस्थ करू लागला. त्यातूनच त्यांनी दुर्गामाता महिला बचत गटाची निर्मिती केली. आपल्या दोन एकर शेतात सुरुवातीला हळद पेरली. त्याच काळात हळदीला अपेक्षित भाव मिळाला नाही. म्हणून मग त्यांना हळद प्रक्रिया उद्योगाची कल्पना सुचली आणि उद्योग निर्मिती करण्याचा प्रवास सुरू झाला. (Women farmer success story)

प्रक्रिया उद्योगातून त्यांनी चांगले उत्पन्न मिळायला लागले त्यातूनच आता त्यांनी दोन एकर शेताची दहा एकर शेती विस्तारित केली आहे.
सध्या पाच एकर शेतात त्या हळद (Turmeric) पिकाची लागवड करतात. पिकाचे आणि पाण्याचे योग्य नियोजन त्या करतात. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न त्यांना मिळत आहे.

हळदीच्या लागवड करुन त्यावर प्रक्रिया करुन पॅकिंगची आवड निर्माण झाली. यामध्येच आपली नवीन ओळख निर्माण करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आणि त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे त्यांना मजुरीतून एक सोनेरी यशाचा मोठा पल्ला गाठता आला आहे.

बचत गटाच्या माध्यमातून घेतली विकत शेती

मजुरी करणारे लक्ष्मीबाई यांनी बचत गटाच्या माध्यमातून घरोघरी हळदीचे पॅकिंग पोहोचवले याच उपक्रम आणि कार्याला आता प्रचंड वेग आला आहे. त्यामुळे अर्थाजन करून लक्ष्मीबाई यांनी आपल्या कुटुंबीयांनाही मोठा आधार दिला आहे. 

जमलेल्या पैशातून त्यांनी आता जवळच शेती घेतली आहे. त्यामुळे बचत गटाच्या माध्यमातून शेती विकत घेणे हा खऱ्या अर्थाने कौतुकास्पद ठरणारा क्षण आहे. त्याबद्दल त्यांना 'राजमाता जिजाऊ पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले.

या बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी १० महिलांना रोजगार देत आहेत. या कामात त्यांना कुटुंबातील सदस्यही मदत करतात. बचत गटाच्या माध्यामातून त्या आता ५ ते ७ लाख रुपयांची उलाढाल करत आहेत.

कठीण काळात डगमगून न जाता ध्येय समोर ठेवून वाटचाल केली तर यश नक्की मिळते. भविष्यात हा उद्योग मोठा करून गावातील महिलांना आणखी रोजगार देण्याचा त्यांचा मानस असल्याचे लक्ष्मीबाई मुटकुळे आवर्जून सांगताना.

हे ही वाचा सविस्तर : Women Success Story : पतीचा अपघात झाला अन् पत्नीने उमेद बाळगत उभारला वेल्डिंगचा व्यवसाय

Web Title: Women farmer success story: Lakshmi, a laborer, gave turmeric a golden color through hard work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.