Lokmat Agro >लै भारी > दहा एकरांत ३०० क्विंटल हळदीचे उत्पन्न काढले, या शेतकऱ्याने कमावले...

दहा एकरांत ३०० क्विंटल हळदीचे उत्पन्न काढले, या शेतकऱ्याने कमावले...

Yielding 300 quintals of turmeric in ten acres, this farmer earned... | दहा एकरांत ३०० क्विंटल हळदीचे उत्पन्न काढले, या शेतकऱ्याने कमावले...

दहा एकरांत ३०० क्विंटल हळदीचे उत्पन्न काढले, या शेतकऱ्याने कमावले...

उत्पादन खर्च वगळून लाखोंचा नफा...

उत्पादन खर्च वगळून लाखोंचा नफा...

शेअर :

Join us
Join usNext

अर्धापूर तालुक्यातील पार्डी म. येथील शेतकऱ्याने दहा एकरांत ३०० क्विंटल हळदीचे उत्पन्न घेतले आहे. एका एकरात ३० क्विंटलचे उत्पन्न निघाल्याने आर्थिक प्रगती साधली आहे.

तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून हळदीचे उत्पन्न काढत आहेत. परंतु बाजारपेठेत हळदीला योग्य दर मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी हळद लागवडीकडे पाठ फिरवली होती. मात्र, तालुक्यातील पार्डी म. येथील शेतकरी गंगाधरराव देशमुख यांनी हळदीची लागवड कमी न करता यंदा ३ एकर जास्त लागवड केली आहे. गत काही वर्षाच्या तुलनेत यंदा त्यांनी दहा एकरांत लागवड केली आहे. अनेक शेतकऱ्यांचे हळदीचे उत्पन्न कमी झाले. मात्र, देशमुख यांनी योग्य नियोजन करून करप्यासारख्या रोगावर नियंत्रण ठेवत एकरी ३० क्विंटलचे उत्पन्न काढले. हळदीला विक्रमी दर मिळत आहे. सध्या बाजारपेठेत हळदीला १७ हजार ते १८ हजार रुपये क्विंटल दर मिळत यांच्यानुसार ३०० क्विंटलचे अंदाजे ५० ते ५५ लाखांचे उत्पन्न मिळत आहे.

दहा एकरात ५५ लाखांचे उत्पन्न

दहा एकरांत ५० ते ५५ लाखांचे उत्पन्न मिळत असून, यातून ५ ते ७ लाखांचे खर्च वजाजाता शेतकऱ्यांना ५० लाखांचे उत्पन्न रुपये नफा होत आहे. अर्धापूर तालुका इसापूर धरणाच्या लाभक्षेत्रात येत असल्यामुळे येथील शेतकरी बारमाही बागायती पिके घेतात. मागील काही वर्षांपासून हळदीला चांगला दर मिळत नाही. तसेच रोगराईमुळे उत्पन्नही कमी होत असल्याने गत वर्षात शेतकऱ्यांनी लागवडीकडे पाठ फिरवली होती.

Web Title: Yielding 300 quintals of turmeric in ten acres, this farmer earned...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.