मेहरुन नाकाडेरत्नागिरी : तालुक्यातील नेवरे येथील विश्वास गणेश जोशी यांनी डिझेल मेकॅनिक शिक्षण घेवून चार वर्ष कोल्हापूर येथे नोकरीही केली. मात्र शेतीची आवड असल्याने नोकरी सोडून गावी आले व शेतीच्या कामामध्ये स्वतःला व्यस्त केले.
एकूण वीस एकर क्षेत्रावर त्यांनी ६०० हापूस, ४०० काजू (वेंगुर्ला ४), नारळ २०, सुपारी १,००० लागवड केली. आहे. शिवाय नारळ, सुपारीमध्ये आंतरलागवड म्हणून काळीमिरी लागवड केली आहे. विश्वास यांचा मुलगा संदीप हा एमएस्सी (हॉर्टीक्लचर) आहे.
संदीप सुध्दा नोकरीच्या मागे न लागता बाबांना शेतीच्या कामात मदत करत आहेत बागायती लगत असलेल्या एक मोकळ्या प्लॉटवर त्यांनी ४०० नवीन सुपारीची लागवड केली आहे. आधी लागवड केलेल्या सुपारीचे उत्पन्न सुरू झाले आहे.
वाळवलेली सुपारी सोलण्यासाठी मनुष्यबळाचा वापर न करता यंत्राचा वापर करत आहेत. शेतीला जोड दूग्धोत्पादन व्यवसाय सुरू केला आहे. दूध विक्रीबरोबरच शेण व गोमूत्रापासून शेणखत, जीवामृत तयार करून त्याचा वापर शेतीसाठी करत आहेत. त्यामुळे उत्पादन व उत्पादकता दोन्ही बाबतीत जोशी पितापूत्र यशस्वी ठरले आहेत.
सेंद्रिय खत निर्मितीबागायतीतील पालापाचोळा, गायीचे शेण, गोमूत्र एकत्र करून त्यापासून सेंद्रिय खत निर्मिती करत असून त्याचा वापर शेतीसाठी करत आहेत. आवश्यकता भासल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर करतात. सेंद्रिय उत्पादनावर त्यांचा भर आहे.
यांत्रिक अवजारांचा वापर- शेतीच्या कामासाठी मजूर उपलब्ध होत नसल्यामुळे यांत्रिक अवजाराचा वापर सुलभ ठरला आहे. वेळ, श्रम, पैशाची बचत होत आहे.- कोकण कृषी विद्यापीठ प्रमाणित सुपारी सोलण्याचे यंत्र जोशी यांनी विकत घेतले आहे.- त्यामुळे दरवर्षी टन, दीड टन सुपारी सोलणे सुलभ होत आहे, सुपारीवर त्यांनी काळीमिरीचे वेल सोडले आहेत.- मिरी तयार झालेनंतर उकळणे, वाळविणे या प्रक्रिया न करता, हिरव्या मिरीची विक्री करत आहेत.- नवी मुंबई येथील वाशी बाजारपेठेत ओल्या काळ्या मिरीला दर तर चांगला मिळतोच, शिवाय विक्री सुलभ होते. यावर्षी जोशी यांनी हिरवी काळीमिरी विक्रीतून एक लाखाचे उत्पन्न मिळवले आहे
>बागेतच विहीर असल्यामुळे ठिबक, तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब केला आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत नाही. बागेमध्ये पालापाचोळ्यापासून गांडूळखत निर्मिती करत असून त्याचा वापर शेतीसाठी करत आहेत.>मुंबई, पुण्यातील ग्राहकांशी संपर्क साधून हापूस विक्री करतात. दर्जेदार आंबा देत असल्यामुळे ग्राहक दरवर्षी त्यांच्याकडून आंबा खरेदी करतात. 'शेतकरी ते ग्राहक' विक्रीवर भर आहे.
व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून शेती केली तर ती नक्कीच परवडते. हाच दृष्टीकोन ठेवून शेती करत आहेत. आता तर मुलाची साथ मिळाली आहे. दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी 'अझोला' निर्मिती करत आहे. बाजारात काळी मिरीसाठी चांगली मागणी आहे. शिवाय नारळ, सुपारी बागेत काळीमिरीची आंतरलागवड शक्य आहे. त्याप्रमाणेच आंतरलागवड केली आहे. मुलगा संदीप यांच्या मदतीने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. त्याचा उपयोग शेती सुलभ होण्यासाठी होत आहे. सोबतच कृ षितज्ज्ञ संदीप डोंगरेयांचेही मार्गदर्शन लाभत आहे. - विश्वास जोशी, नेवरे
अधिक वाचा: श्रीगोंद्याच्या आढळगाव शिवारात दरवळला प्रथमच बडीशेपचा सुगंध