Lokmat Agro >लै भारी > Young Farmer Success Story : एमबीए उच्च शिक्षित शुभमने ऊस शेतीत गाठला ११० टनाचा टप्पा वाचा सविस्तर

Young Farmer Success Story : एमबीए उच्च शिक्षित शुभमने ऊस शेतीत गाठला ११० टनाचा टप्पा वाचा सविस्तर

Young Farmer Success Story : MBA highly educated Shubham reaches 110 ton production in sugarcane farming Read more | Young Farmer Success Story : एमबीए उच्च शिक्षित शुभमने ऊस शेतीत गाठला ११० टनाचा टप्पा वाचा सविस्तर

Young Farmer Success Story : एमबीए उच्च शिक्षित शुभमने ऊस शेतीत गाठला ११० टनाचा टप्पा वाचा सविस्तर

केडगाव २२ फाटा येथील शुभम शिवराम बारवकर या (एमबीए ) उच्च शिक्षित युवकाने उसाचे ११० टन एवढे विक्रमी उत्पन्न घेतले आहे.

केडगाव २२ फाटा येथील शुभम शिवराम बारवकर या (एमबीए ) उच्च शिक्षित युवकाने उसाचे ११० टन एवढे विक्रमी उत्पन्न घेतले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

बापू नवले
केडगाव: २२ फाटा येथील शुभम शिवराम बारवकर या (एमबीए ) उच्च शिक्षित युवकाने उसाचे ११० टन एवढे विक्रमी उत्पन्न घेतले आहे. उसाचे रोप वाटिका पासून ऊसतोड येईपर्यंत सर्व शेतीतील कामे घरातील सदस्यांनीच जातीने लक्ष देऊन केल्यामुळे विक्रमी उत्पादन मिळाले.

पारंपारिक पद्धतीने उसाचे बेणे न करता १४ महिन्यांपूर्वी शुभमने उसाचे रोप घरच्या घरीच बनवले. अद्यावत रोपवाटिका तंत्रज्ञानाचा वापर अल्पावधीत उसाची वाढ होण्यास मोठी मदत होते.

त्यासाठी घरच्या घरी ८६०३२ या वाणाचे उसाचे बेणे तयार केले. एक डोळा कटरच्या मदतीने सरळ असणारे ऊस कट केले. कोकोपीट (नारळाचा भुसा) प्लास्टिक ट्रे मध्ये कट केलेले ऊसाचे डोळे टाकले.

त्यामध्ये कॅनोन, बाविस्टिन व इतर काही पौष्टिक खतांच्या माध्यमातून उत्कृष्ट उगवण क्षमता रोपांमध्ये निर्माण केली. उसाच्या कोंबांची व्यवस्थित वाढ झाल्याचे पाहून त्याची लागवड शेतामध्ये करून घेतली.

येथे उसाची प्रजाती स्वतःच्या शेतामधील असल्यामुळे उगवण क्षमतेबाबत शाश्वती निर्माण झाली. लागवड करताना फक्त एकाच वेळी मोकळे पाणी दिले त्यानंतर सातत्यपूर्ण ड्रिपवरच पाणी दिले.

मशागतीसाठी घरगुती ट्रॅक्टरचा वापर केला जातो. आधुनिक उपकरणांच्या साह्याने शेती केली जाते. कुटुंबातील सर्व सदस्य शेतात मजूरविरहित राबतात. खूप कमी वेळा मजुरांना शेतात बोलवले जाते. अन्यथा सर्वच्या सर्व काम घरच्या घरी केली जातात.

उसाला तीन वेळा ड्रिंचींग, चार वेळा फवारणी तर तीन खतांचे डोस दिले. काही वॉटर सोलूबल खत ड्रीपद्वारे देखील सोडले गेले. पाण्यासाठी सौर उर्जेवर चालणारी मोटर वापरल्याने पाण्याचा नियमित पुरवठा होत गेला.

उसाची वाढ होत असताना सुरुवातीला फुटवा संख्या नियोजन केले. पाच महिन्यानंतर येणारे फुटवे अनावश्यक असतात त्यावर नियंत्रण ठेवले. एका बेटात ९ ते १० उसांची संख्या नियंत्रित केली.

त्यामुळे उत्कृष्ट पद्धतीने उसाचे सुमारे ३५ ते ३६ कांडी म्हणजे १५ फुटापेक्षा जास्त वाढ १४ महिन्यातच झाली. त्यामुळे उसाला चांगले वजन मिळाले.

कुटुंबातील आजी सुमन, आजोबा केरबा, आई उषा, वडील शिवराम, चुलती नलिनी, चुलते संतोष व पत्नी माधुरी हे सर्वजण राबतात. एकत्रित कुटुंबामुळे बाहेरील मजूर घेण्याचे गरज पडत नाही. यापूर्वी गुलछडी, काकडी, वांगी, कांदा या पिकांचे देखील विक्रमी उत्पादन घेतले आहे. -  शुभम बारवकर, युवा शेतकरी

अधिक वाचा: बिहारच्या उच्च शिक्षित तरुणाने नोकरी सोडून कोकणच्या मातीत पिकवली लाल भेंडी

Web Title: Young Farmer Success Story : MBA highly educated Shubham reaches 110 ton production in sugarcane farming Read more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.