निळवंडे धरणातून सिंचन व बिगर सिंचनाकरता आज १२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता हरिश चकोर यांनी ही माहिती दिली.
जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, आज निळवंडे धरणात ४४.९१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तर १०४.२७ दलघमी पाणी उरले आहे. आज सकाळी ७ वाजता निळवंडे धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे.
अहमदनगरच्या धरणांमध्ये राहिले एवढे पाणी
१)भंडारदरा-- ५३२४दलघफु(४८.२३%)
२)निळवंडे--३८१४दलघफु(४५.८४%)
उन्हाळ्याच्या तोंडावर धरणसाठा खालावला आहे. तापमानवाढीमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. दरम्यान, पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे.