Join us

किटवडे परिसरात सात दिवसांत १४५४ मि.मी. पाऊस

By बिभिषण बागल | Published: July 25, 2023 10:03 AM

चालू वर्षाच्या पावसाळ्यातील हा उच्चांकी पाऊस आहे. किटवडे येथे जलविज्ञान प्रकल्प विभागातर्फे बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक पर्जन्यमापक यंत्रात ही नोंद झाली आहे.

प्रति 'चेरापुंजी' म्हणून ओळख असलेल्या आजरा तालुक्यातील किटवडे परिसरात गेल्या ७ दिवसांत १४५४ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. चालू वर्षाच्या पावसाळ्यातील हा उच्चांकी पाऊस आहे. किटवडे येथे जलविज्ञान प्रकल्प विभागातर्फे बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक पर्जन्यमापक यंत्रात ही नोंद झाली आहे. मुसळधार पावसाने हिरण्यकेशी नदी धोक्याच्या पातळीवर आहे.समुद्रकिनाऱ्यावरून येणारे पावसाचे ढग थेट किटवडे परिसरात कोसळतात. त्यामुळे दररोज सरासरी २०० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस पडतो. 

प्रतिवर्षी जून ते सप्टेंबर अखेर ९००० ते ७५०० हजार मिलिमीटर पाऊस या ठिकाणी होतो. चालू वर्षी १८ जुलैपासून सर्वच बंधाऱ्यांवर ८ दिवस पाणी आहे. विद्यार्थ्यांना आणण्यासाठी किटवडे येथे गेलेली एस.टी. एक दिवस गावातच अडकून पडली होती. हिरण्यकेशीचे पाणी शेतात घुसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

किटवडे परिसरातील दैनंदिन पाऊस१८ जुलै - १९३३ मिलिमीटर १९ जुलै २४७ मिलिमीटर२० जुलै - ११५ मिलिमीटर २१ जुलै २८३ मिलिमीटर२२ जुलै  - २१० मिलीमीटर २३ जुलै २४६ मिलीमीटर२४ जुलै - २२० मिलिमीटर

४ महिने सूर्यदर्शनच नाहीकिटवडे परिसरातील गावांना पावसामुळे ४ महिने सूर्यदर्शनच होत नाही. दररोज २०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो. नदीला येणाऱ्या पुरामुळे नागरिकांचा आजच्याशी संपर्क तुटतो. त्यामुळे नागरिक मे महिन्यातच दिवाळीपर्यंतचा बाजार घरात भरून ठेवतात. 

टॅग्स :हवामानशेतकरीपाऊसपीक