Lokmat Agro >हवामान > कुकडी प्रकल्पात १९.०८ टक्के पाणीसाठा शिल्लक; गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३ टक्क्यांनी पाणीसाठ्यात घट

कुकडी प्रकल्पात १९.०८ टक्के पाणीसाठा शिल्लक; गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३ टक्क्यांनी पाणीसाठ्यात घट

19.08 percent water storage remaining in Kukdi project; 3 percent decrease in water storage this year compared to last year | कुकडी प्रकल्पात १९.०८ टक्के पाणीसाठा शिल्लक; गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३ टक्क्यांनी पाणीसाठ्यात घट

कुकडी प्रकल्पात १९.०८ टक्के पाणीसाठा शिल्लक; गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३ टक्क्यांनी पाणीसाठ्यात घट

Kukdi Water Storage : डिंभे कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाचही धरणांच्या पाणीसाठ्धात यंदा झपाट्याने घट झाली आहे. सध्या प्रकल्पातील डिंभे धरणासह सर्वच धरणांतील पाणीसाठ्यांनी तळ गाठले आहे. 

Kukdi Water Storage : डिंभे कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाचही धरणांच्या पाणीसाठ्धात यंदा झपाट्याने घट झाली आहे. सध्या प्रकल्पातील डिंभे धरणासह सर्वच धरणांतील पाणीसाठ्यांनी तळ गाठले आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

कांताराम भवारी 

डिंभे कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाचही धरणांच्या पाणीसाठ्धात यंदा झपाट्याने घट झाली आहे. सध्या प्रकल्पातील डिंभे धरणासह सर्वच धरणांतील पाणीसाठ्यांनी तळ गाठले आहे. 

आजमितीस या प्रकल्पात केवळ ५६६३.२५ म्हणजेच अवघा १९.०८ टक्के इतका निचांकी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मागील वर्षी या तारखेला प्रकल्पात २२४८ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक होता.

या तुलनेत यंदाचा पाणीसाठा ३ टक्क्यांनी कमी झाला असून, में अखेरपर्यंत प्रकल्पातील धरणे कोरडी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिल्लक पाणीसाठत्वाचा काटकसरीने वापर न केल्यास उन्हाळ्याच्या अखेरच्या दिवसांत प्रकल्पांतर्गत येणान्या धरण पाणलोट क्षेत्रातील पाणी योजना धोक्यात येऊन पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

जुन्नर तालुक्यातील येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव ओगा, तर आंबेगाव तालुक्यातील विभे घरण या पाच धरणांचा मिळून कुकही प्रकल्प तयार होतो.

या प्रकल्पाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, शिरूर व अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, अशा एकृष्ण सात तालुक्यांतील सुमारे १७६२७८ हेक्टर एक्ने क्षेत्र कालव्याद्वारे सिंचनाखाली आले आहे.

या प्रकल्पावर या भागातील सर्व सिंचन प्रकल्प व पाणी योजना अवलंबून आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात प्रकल्पातील सर्वच धरणांतील पाणीसाठ्चात कमालीची घट झाली आहे.

प्रकल्पांतर्गत येणाऱ्या धरणातून रबीसाठी व खरिपासाठी रोटेशन पूर्ण झाले आहेत. यामुळे आजमितीस कुकडी प्रकल्पात अवघा १९०८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

वाढती उन्हाची तीव्रता व पाण्याच्या मागणीमूळे यंदा या प्रकल्पातील धरणे मे महिन्याच्या अखेरपर्यंत कोरडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पूर्वीप्रमाणे पाउसाला ही वेळेवर सुरू होत नसल्याने प्रकल्पातील पाण्याचे नियोजनपूर्वक वापर करणे गरजेचे आहे.

या प्रकल्पात असणाऱ्या पाण्यावरच सगळ्यांच्या नजरा लागून राहिलेल्या असतात, तर प्रकल्पातील धरणांच्या आतील गावांच्या पाणी योजनाही या धरणावर अवलंबून असतात.

बऱ्याचदा सिंचन क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीमुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येते व मग धरणाच्या आतील गावांच्या पिण्याच्या पाणी योजना अडचणी घेऊन दरवर्षी या भागातील गाजीना पिण्याच्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे चित्र नेहमीच पाहायला मिळते. यंदाही याची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे दिसू लागले आहेत.

७ तालुके सुमारे १,५६,२७८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले

पुणे जिल्ह्यातील अविगाय, जुन्नर, शिरूर व अहमदनगरच्या पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, मोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील १.५६.२०८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.

कुकडी प्रकल्पातील प्रमुख धरणे व त्यातील पाणीसाठा

• येडगाव कुकडी प्रकल्पातील हे महत्वाचे धरण आहे. धरणाची लांबी ३४१० मौटर असून, उंची २३.६० मीटर आहे. हे धरण पिकअप विअर म्हणून बांधण्यात आले असून, डिमे, माणिकडीह, पिंपळगाव व वहज या धरणांमधून या धरणात पाणी सोडण्यात येते. या धरणास २४२ किलोमीटर लांबीचा दावा कालवा काढण्यात आला आहे. धरणाची एकूण साठवण क्षमता 3.3 टीएमसी एवढी असून, सध्या या धरणात १८.७१ टक्के एवढा पाणीसाठा आहे.

• माणिकडोह धरणाची लांबी १३० मीटर असून, उंची ५१.८० मीटर एवढी आहे. था धरणास २३.५० किलोमीटरचा कालवा असून, धरणाची एकूण साठवण क्षमता १०.८३३ एवढी आहे, सध्या या वरणात ६.२३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

• वडज प्रकल्पातील हे धरण मीना नदीवर बांधण्यात आले आहे. या धरणास १४ किलोमीटरचा मीना पूरक कालवा व ४० किलोमीटरचा मीनाशाखा कालवा काढण्यात आला आहे. या वरणाची एकूण साठवण क्षमता १.२७१ टीएमसी एवढी असून, सध्या या वरणात ३४.२३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

• पिंपळगाव जोगा कुकडी प्रकल्पात येणाऱ्या या धरणाची लांबी १५६० मीटर असून, धरणास पाच वक्र दरवाजे आहेत, धरणातून ७० किलोमीटरचा डावा कालवा काढण्यात आला आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ७.६८७ टीएमसी असून, आजतागायत या चरणात १६.२५ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.

• डिंभे धरण हे कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठे धरण आहे. या धरणात ११६ किलोमीटरचा उजवा कालवा व ५५ किलोमीटरचा डावा कालवा काढण्यात आला आहे. आजमितीस धरणात २८.८७टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.

हेही वाचा : ऑनलाईन माहिती घेत रणजित करताहेत शेती; १० गुंठे क्षेत्रात झाली अडीच लाखांची पपई

Web Title: 19.08 percent water storage remaining in Kukdi project; 3 percent decrease in water storage this year compared to last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.