Lokmat Agro >हवामान > कोल्हापूर जिल्ह्यातील ३१ बंधारे पाण्याखाली.. जाणून घ्या प्रमुख धरणांची पाणीपातळी

कोल्हापूर जिल्ह्यातील ३१ बंधारे पाण्याखाली.. जाणून घ्या प्रमुख धरणांची पाणीपातळी

31 check dams under water in Kolhapur district.. Know the water level of major dams | कोल्हापूर जिल्ह्यातील ३१ बंधारे पाण्याखाली.. जाणून घ्या प्रमुख धरणांची पाणीपातळी

कोल्हापूर जिल्ह्यातील ३१ बंधारे पाण्याखाली.. जाणून घ्या प्रमुख धरणांची पाणीपातळी

सायंकाळी पाचपर्यंत पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावर २८ फूट ८ इंच पाण्याची पातळी राहिली. आज, बुधवारी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

सायंकाळी पाचपर्यंत पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावर २८ फूट ८ इंच पाण्याची पातळी राहिली. आज, बुधवारी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाचा जोर कमी राहिला. मात्र तळकोकण आणि धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्याने जिल्ह्यातील ३१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

सायंकाळी पाचपर्यंत पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावर २८ फूट ८ इंच पाण्याची पातळी राहिली. आज, बुधवारी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

गेल्या चार, पाच दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. पन्हाळा, शाहूवाडी, आजरा, चंदगड या डोंगराळ तालुक्यात पावसाची संततधार राहिली. यामुळे नदी, नाल्यातील पाणी पातळीत वाढ झाली.

पंचगंगा नदीतील पाणी पात्राबाहेर पडले. पण सोमवारपासून पावसाचा दिवसभरही पावसाचे प्रमाण कमी राहिले. काही वेळ उन आणि इतर वेळी तुरळक प्रमाणात पावसाच्या सरी राहिल्या. परिणामी पंचगंगा नदीतील पाणी पातळीत घट होत आहे.

मंगळवारी सकाळी १० वाजता राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी २९ फूट ९ इंच होती. दुपारी दोनपर्यंत ९ इंचानी कमी झाली. दुपारी ३ वाजता २८ फूट १० इंच पाणी पातळी राहिली. सायंकाळी पाचपर्यंत २८ फूट ८ इंच राहिली. दिवसभर पाणी पातळी घटत राहिली. राधानगरी धरणात ४.६९ टीएमसी पाणीसाठा आहे. धरणातून १,४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, ताम्रपर्णी नदीवरील कुर्तनवाडी, चंदगड व हल्लारवाडी, वेदगंगा नदीवरील कुरणी, बस्तवडे व चिखली, हिरण्यकेशी नदीवरील साळगाव, दुधगंगा नदीवरील दत्तवाड, कासारी नदीवरील येवलूज पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, वालोली, बाजार भोगाव, वारणा नदीवरील चिंचोली, तांदूळवाडी, कोडोली व खोची, भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे व सरकारी कोगे, कुंभी नदीवरील शेनवडे, मांडुकली व कळे असे ३१ बंधारे पाण्याखाली आहेत.

६५ हजार क्सुसेकपर्यंत विसर्ग वाढवणार
अलमट्टी धरणातील आवक वाढत आहे. ४० हजार वरून ६५ हजार क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने दिली.

जनावरांसाठी छावण्या सुरु करण्याचे नियोजन
महापूर आल्यास बाधित गावातील जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवून चारा छावण्या सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. यासाठी विस्थापित जनावरांना चारा, पशुखाद्य, पाणी पुरवण्यासाठी दरपत्रक देण्याचे आवाहन केले आहे.

धरणातील पाणीसाठा (टीएमसी)
राधानगरी ४.६९
तुळशी १.९५
वारणा २०.६१
दूधगंगा १०.९२
कासारी १.६९
कडवी १.९०
कुंभी १.३४
पाटगाव २.७०
चिकोत्रा ०.६५
चित्री १.३०
जंगमहट्टी १.१२
घटप्रभा १.५६
जांबरे ०.८२
आंबेआहोळ १.४
सर्फनाला ०.२८
कोदे प्रकल्प ०.२१

Web Title: 31 check dams under water in Kolhapur district.. Know the water level of major dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.