Join us

उजनी शुन्यावर, जायकवाडीत ३९.८४%,उर्वरित धरणांत किती पाणीसाठा?

By मुक्ता सरदेशमुख | Published: January 28, 2024 11:59 AM

राज्यातील धरणांमधील पाणीसाठा कमी होत असल्याने पाणीटंचाईचे संकट हळूहळू गडद होतानाचे चित्र आहे.

राज्यातील धरणांमधीलपाणीसाठा कमी होत असल्याने पाणीटंचाईचे संकट हळूहळू गडद होतानाचे चित्र आहे. उजनी धरण ०.६५ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर जायकवाडी धरणात आता अवघे ३९.८४ टक्के पाणी शिल्लक आहे. 

बीड जिल्ह्यातील मांजरा धरण १६.२६ टक्के भरले असून माजलगाव धरणात ६.०७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.हिंगोलीतील सिद्धेश्वर धरण आता २९.९४ टक्के भरले आहे. तर येलदरी धरणात ५६.९४ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. धाराशिवच्या तेरणा धरणात ११.०४ टक्के पाणी उरले आहे तर सिना कोळेगाव शुन्यावर गेले आहे. परभणीच्या निम्न दुधनामध्ये १६.५७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

उजनी धरणात शिल्लक पाण्याचे कसे असेल नियोजन

मध्य महाराष्ट्रातील धरणांमध्ये किती पाणी?

नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये आता ६२.७३ टक्के पाणी शिल्लक आहे. दारणा धरणात ५१.९६ टक्के पाणी उरले असून गिरणा धरणात ४२.०१ टक्के पाणी आहे. कोल्हापूरच्या दुधगंगा धरणात ६८.४७ टक्के पाणी राहिले आहे. पुण्यातील डिंभे धरण ६९.३५ टक्के भरले आहे. पवना ५७.७६ तर पानशेत ७८.४९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. साताऱ्यातील कोयना धरण ७०.६२ टक्के भरले आहे तर सांगलीतील वारणा धरणात ७४.८६ टक्के पाणी शिल्लक आहे.

उजनी धरणात दहा वर्षात प्रथमच मायनसमध्ये..

गेल्या दहा वर्षांनंतर उजनी प्रथमच जानेवारी महिन्यात मृत साठ्यात गेले आहे. पुढचे पाच ते सहा महिने साधारण जून ते जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याची गरज भासणार आहे. मृत साठ्यातील ६३ टीएमसी पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यंदा उजनीची वजा ५५ ते ६० टक्के पाणी पातळी खाली जाऊ शकते. १२ फेब्रुवारीनंतर महिनाभर कोणत्याही योजनेतून सोडण्यात येणार नाही. त्यानंतर मार्च आणि मे महिन्यात सोलापूर शहरासाठी १० टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन आहे.

टॅग्स :धरणपाणीपाणी टंचाई