नातेपुते : नीरा खोऱ्यातील भाटघर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असून, धरण परिसरात गेल्या २४ तासात ४२१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत असून, ०.५९ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.
नीरा खोऱ्यातील धरण क्षेत्रात कमीअधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे सर्व धरणांतील पाणीसाठा वाढत आहे. बुधवार, ३ जुलै रोजी नीरा खोऱ्यातील गुंजवणी, निरा देवघर, वीर, भाटघर धरणावर पावसाला सुरुवात झाली.
दोन दिवसांत पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. चारही धरणांतील पाणीसाठ्याची सरासरी १६.२७ टक्के असून, उपयुक्त पाणीसाठा १६.२७ टीएमसी आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत २.८३ टक्के जादा पाणीसाठा आहे. मंगळवार व बुधवारी चारही धरण क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली आहे.
यामध्ये गुंजवणी पाणलोट क्षेत्रात १४१मिमी, भाटघर धरण क्षेत्रात ३४१ मिमी, वीर धरण क्षेत्रात ७५मिमी, नीर देवघर धरण क्षेत्रात ९० मिमी पाऊस पडला आहे. निरा खोरे अहवालानुसार गुंजवणी १९.११ टक्के, भाटघर १३.८३ टक्के, नीरा देवघर १२.३१, वीर धरणा २६.२० टक्के भरले आहे.
नीरा खोऱ्यातील पावसामुळे फलटण माळशिरस, पंढरपूर, सांगोला लाभक्षेत्रातील शेतकरीसह सर्वसामान्य नागरिक सुखावला आहे.
अधिक वाचा: Ujani Dam गेल्या २५ दिवसांत उजनीत वाढला किती टीएमसी पाणीसाठा