Join us

या धरणाचा दरवाजा गेला वाहून सोडावे लागणार ५० टीएमसी पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 4:12 PM

कोप्पल कर्नाटकातील तुंगभद्रा धरणाचा एक दरवाजा शनिवारी रात्री साखळी तुटल्याने वाहून गेला.

कोप्पल कर्नाटकातील तुंगभद्रा धरणाचा एक दरवाजा शनिवारी रात्री साखळी तुटल्याने वाहून गेला. त्यामुळे कोप्पलच्या खालील भागात तसेच आंध्र प्रदेशातही पुराचा इशारा देण्यात आला.

कृष्णा नदीकाठावर राहणाऱ्यांना सतर्क राहण्यास आणि कालवे व नाले ओलांडणे टाळण्यास सांगितले आहे. सध्या धरणातून ८९,००० क्युसेक विसर्ग होत आहे.

अधिकाऱ्यांनी एका दरवाजावर पडणारा दाब कमी करण्यासाठी पाच दरवाजे वगळता सर्व दरवाजे ताबडतोब उघडले. यामुळे जलाशयाची पातळी कमी होऊन वाहून गेलेल्या दरवाजा क्रमांक १९ च्या दुरुस्ती करता येईल. 

२० फूट पाणी सोडावे लागेलकोप्पलचे प्रभारी मंत्री शिवराज तंगडगी म्हणाले की, धरण रिकामे करावे लागणार आहे. धरणातून ६० ते ६५ टीएमसी पाणी सोडावे लागेल. २० फूट पाणी सोडल्यानंतरच हा प्रश्न सुटू शकेल.

टॅग्स :धरणपाणीनदीआंध्र प्रदेश