Join us

मुळा धरणामध्ये ६२ तर भंडारदरात ५८ टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 1:01 PM

अहमदनगर जिल्ह्यात यंदा कमी पर्जन्यमान झाल्याने धरणांतील पाणीसाठ्यावरच भिस्त आहे. धरणांतील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास ऐन उन्हाळ्यात नगरकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यात यंदा कमी पर्जन्यमान झाल्याने धरणांतीलपाणीसाठ्यावरच भिस्त आहे. धरणांतील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास ऐन उन्हाळ्यात नगरकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नाही. मुळा व भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रातही गतवर्षीच्या तुलनेत कमी पाऊस पडला, त्यात यावर्षी समन्यायी पाणीवाटप कायद्याची अंमलबजावणी करत मुळा व भंडारदरा धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले आहे.

त्यामुळे मुळा व भंडारदरा धरणातील पाणीसाठ्यात घट झाली असून, सध्या मुळा धरणात ६२ तर भंडारदरा धरणात ५८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यात मुळा धरणातून शेतीसाठी आवर्तन सुरू आहे. नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा ६२ इतका जलसाठा आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने महापालिकेच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याच्या सूचनाही केलेल्या आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नगरकरांना पाण्यासाठी पैसे मोजावे लागतील, असे काहींचे म्हणणे आहे.

सध्या टँकरचा भाव ६००; उन्हाळ्यात जातो ७०० पर्यंत• नगर शहरात पाण्याच्या टँकर्सचे भाव फारसे बदलत नाहीत. सध्या ६०० ते ७०० रुपये इतके दर आहेत. उन्हाळ्यातही याप्रमाणेच दर असतात.• टँकरच्या दरात होणारी वाढ ही किती लिटरचा टँकर आहे, त्यावर आणि किती अंतरावर टँकर पोहोचवायचा आहे त्यावर दर ठरतात.

धरणातील पाणीसाठा

धरण पाण्याची टक्केवारी
आढळा८३.५९
मुळा६२.१७
भंडारदरा५८.६२
निळवंडे५०.१६

मुळा धरणात जुलैअखेरपर्यंत पुरेल एवढे पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची अडचण येणार नाही. परंतु, तरीही नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा. - सायली पाटील, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग

टॅग्स :धरणपाणीमुळा मुठाभंडारादुष्काळउजनी धरण