Lokmat Agro >हवामान > Earthquake in Koyna Dam: कोयना परिसरात २.८ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

Earthquake in Koyna Dam: कोयना परिसरात २.८ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

A 2.8 magnitude earthquake struck in Koyna dam area | Earthquake in Koyna Dam: कोयना परिसरात २.८ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

Earthquake in Koyna Dam: कोयना परिसरात २.८ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

Earthquake in Koyna Dam: कोयना धरण परिसरात बुधवारी दुपारी ३ वाजून २६ मिनिटांनी koyna bhukamp भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला.

Earthquake in Koyna Dam: कोयना धरण परिसरात बुधवारी दुपारी ३ वाजून २६ मिनिटांनी koyna bhukamp भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला.

शेअर :

Join us
Join usNext

कोयनानगर : कोयना धरण परिसरात बुधवारी दुपारी ३ वाजून २६ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. कोयना भूकंपमापन केंद्रावर त्याची २.८ रिश्टर स्केल नोंद झाली आहे.

हा भूकंपाचा धक्का पाटण तालुक्यातील कोयना व रत्नागिरी जिल्ह्यांतील पोफळी, ता. चिपळूण परिसरात जाणवला. भूकंपाच्या धक्क्याने कोणतीही हानी झाली नसून, धरण सुरक्षित असल्याचे माहिती धरण व्यवस्थापनाने दिली.

कोयना परिसराला बुधवारी दुपारी ३ वाजून २८ मिनिटांनी भूकंपाच्या सौम्य धक्का जाणवला. कोयना येथील भूकंपमापन केंद्रावर या सौम्य भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली आहे. त्याची तीव्रता २.८ रिश्टर स्केल इतकी होती.

भूकंपाच्या केंद्रबिंदूची खोली पंधरा किलोमीटर आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून तेरा किलोमीटर अंतरावर आहे. हा केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या पश्चिमेला दहा किलोमीटर अंतरावर होता.

कोयना भूकंपमापन केंद्रामध्ये सध्या मायक्रो अर्थक्विक रिकॉर्डर (एमईक्यू-८००) व डिजिटल मायक्रो अर्थक्विक रिकॉर्डर या उपकरणाद्वारे झालेल्या भूकंपाची नोंद केली जाते. बुधवारी झालेल्या भूकंपाची नोंद याच एमईक्यू ८०० या उपकरणावर झाली.

अधिक वाचा: Koyna Dam Water Level: गुडन्यूज कोयना धरणातील पाणीसाठा पोहचला इतक्या टीएमसीवर

Web Title: A 2.8 magnitude earthquake struck in Koyna dam area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.