Lokmat Agro >हवामान > अकोला सर्वाधिक 'हॉट; यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान बुधवारी नोंदविले गेले

अकोला सर्वाधिक 'हॉट; यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान बुधवारी नोंदविले गेले

Akola is the most 'hot; The highest temperature of this summer was recorded on Wednesday | अकोला सर्वाधिक 'हॉट; यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान बुधवारी नोंदविले गेले

अकोला सर्वाधिक 'हॉट; यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान बुधवारी नोंदविले गेले

यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद बुधवारी

यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद बुधवारी

शेअर :

Join us
Join usNext

बुधवारीही तापमानानेअकोलाकरांना चांगलाच घाम फोडला. यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद बुधवारी झाली असून, पारा ४४.८ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. दिवसभर शहरातील रस्त्यांवर शुकशुकाटच जाणवला. दरम्यान, २३ ते २५ मेदरम्यान तापमानाचा पारा ४५ अंशांवर जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

भारतीय हवामान खात्याच्या नागपूर वेधशाळेने घेतलेल्या नोंदीनुसार बुधवारी अकोल्यातील तापमान ४४.८ अंश सेल्सिअस होते. त्यामुळे दुपारी १ ते ५ वाजेदरम्यान शहरात सर्वत्र शुकशुकाट जाणवला. अनेक वाहन, रिक्षाचालकांनी झाडाच्या सावलीचा आसरा घेत दिवस काढल्याचे चित्र दिसून आले. यंदाच्या उन्हाळ्यातील हे सर्वाधिक तापमान ठरले आहे. यापूर्वी अकोल्यात सर्वाधिक ४४.४ अंश सेल्सिअस तापमान ५ मे रोजी नोंदविल्या गेले होते. त्यानंतर प्रथमच पारा ४४.४ अंशाच्या पुढे गेला आहे.

काय काळजी घ्याल?

■ शक्यतो घराबाहेर पडू नका.

■ तहान लागली नसेल तरी दिवसभर सातत्याने पाणी पित राहावे.

■ पातळ, सुती, हलक्या रंगाचे कपडे घालावेत.

■ बाहेर जाताना गॉगल, स्कार्फ, रुमाल, टोपीचा वापर करावा.

■ प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.

■ शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास लिंबूपाणी, ताक, ओआरएस आदींचे सेवन करावे.

■ लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठांनी जास्त काळजी घ्यावी.

■ शेतातील काही शारीरिक श्रमाची कामे बाकी असतील तर ती दुपारी उन्हांच्या वेळेस टाळावीत.

गेले चार दिवसांत असे वाढले तापमान

रविवार ४३.२

सोमवार ४३.८

मंगळवार ४४.०

बुधवार ४४.८

हेही वाचा - Success Story शाळा सांभाळून पत्नीच्या मदतीने शिक्षक शेतकऱ्याने फुलवली जांभळाची बाग

Web Title: Akola is the most 'hot; The highest temperature of this summer was recorded on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.