Lokmat Agro >हवामान > 'एल-निनोमुळे पुढील आठवड्यात येणारे थंडीचे आवर्तनही ठरू शकते शेवटचेच' 

'एल-निनोमुळे पुढील आठवड्यात येणारे थंडीचे आवर्तनही ठरू शकते शेवटचेच' 

al nino cyclone weather next week winter farmer agriculture crop | 'एल-निनोमुळे पुढील आठवड्यात येणारे थंडीचे आवर्तनही ठरू शकते शेवटचेच' 

'एल-निनोमुळे पुढील आठवड्यात येणारे थंडीचे आवर्तनही ठरू शकते शेवटचेच' 

पुढील तीन दिवस म्हणजे २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान कमाल व किमान तापमानात वाढ होऊन थंडी काहीशी कमी होण्याची शक्यता जाणवते.

पुढील तीन दिवस म्हणजे २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान कमाल व किमान तापमानात वाढ होऊन थंडी काहीशी कमी होण्याची शक्यता जाणवते.

शेअर :

Join us
Join usNext

लागोपाठ येणाऱ्या पश्चिमी झंजावातातून तसेच २८ ते ३० डिग्री अक्षवृत्त दरम्यान उत्तर भारतात, १२ किमी. उंचीवरील तपाम्बरच्या पातळीतील ताशी २७० ते ३०० किमी. वेगाने वाहणाऱ्या पश्चिमी वाऱ्याच्या झोतामुळे, अश्या एकत्रित घडून आलेल्या घडामोडीमुळे महाराष्ट्राला एक फेब्रुवारीपर्यंत माफक पण थंडी अनुभवावयास मिळालीच. दिवसाचे कमाल तापमानही सरासरीपेक्षा कमीच राहिले. त्यामुळे दिवसाचा ऊबदारपणाही कमी राहून थंडीस मिळण्यास मदत मिळाली. 

थंडी कमी होणार 
पुढील तीन दिवस म्हणजे २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान कमाल व किमान तापमानात वाढ होऊन थंडी काहीशी कमी होण्याची शक्यता जाणवते. खानदेशातील नंदुरबार, धुळे, जळगांव जिल्ह्याच्या उत्तरेकडील परिक्षेत्रात ह्या ३ दिवसात काहीसे ढगाळ वातावरण राहू शकते. 

पुन्हा थंडी मिळणार 
येत्या दोन दिवसात पश्चिम हिमालयीन क्षेत्रात पुन्हा नवीन येऊ घातलेल्या पश्चिमी झंजावाताच्या परिणामातून, सोमवार दि.५ फेब्रुवारी ते रविवार दि.११ फेब्रुवारी पर्यन्तच्या संपूर्ण आठवडाभर कमाल व किमान तापमानाचा पारा घसरून महाराष्ट्रात पुन्हा चांगलीच थंडी पडण्याची शक्यता जाणवते. मात्र हिवाळी हंगामासाठीचे कदाचित हे शेवटचेच थंडीचे आवर्तन ठरण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. 

- माणिकराव खुळे Meteorologist (Retd) IMD Pune.

Web Title: al nino cyclone weather next week winter farmer agriculture crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.