Lokmat Agro >हवामान > चिंताजनक! राज्यातील धरणांमध्ये आता ४६.६० टक्के पाणी शिल्लक, कोणत्या धरणात किती साठा?

चिंताजनक! राज्यातील धरणांमध्ये आता ४६.६० टक्के पाणी शिल्लक, कोणत्या धरणात किती साठा?

Alarming! 46.60 percent water remaining in the dams of the state now, how much stock in which dam? | चिंताजनक! राज्यातील धरणांमध्ये आता ४६.६० टक्के पाणी शिल्लक, कोणत्या धरणात किती साठा?

चिंताजनक! राज्यातील धरणांमध्ये आता ४६.६० टक्के पाणी शिल्लक, कोणत्या धरणात किती साठा?

अनेक धरणे गेली मायनसमध्ये, मराठवाडा, नाशिक, कोकण , पुणे, विदर्भ सर्व विभागांमधील धरणांमध्ये किती पाणी शिल्लक?

अनेक धरणे गेली मायनसमध्ये, मराठवाडा, नाशिक, कोकण , पुणे, विदर्भ सर्व विभागांमधील धरणांमध्ये किती पाणी शिल्लक?

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने हजेरी लावली असली तरी विविध भागात आता पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसण्यास सुरुवात झाली आहे.फेब्रुारी महिन्याच्या शेवटी राज्यातील धरणांमध्ये केवळ ४६.६० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मराठवाड्यात राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत २४.५२ टक्के एवढा  सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक राहिलाय. मागील वर्षात याच दिवशी हा पाणीसाठा ४७.३४ टक्के एवढा होता.

नागपूर विभागातील ३८३ धरणांमध्ये ५५.४३ टक्के तर अमरावती विभागातील २६१ धरणांमध्ये ५७.८८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

नाशिक विभागात एकूण ५३७ लघू, मध्यम व मोठी धरणे असून त्यात आता ४७.५४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुण्यातील धरणांमध्ये ४८.११ टक्के तर कोकण विभागातील १७३ धरणांमध्ये ५९.६९ टक्के पाणीसाठा आता राहिला आहे.

जायकवाडीत उरले एवढेच पाणी

मराठवाड्यातील लाखो नागरिकांची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात  आता २६.४४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. म्हणजे ५७४.०४ दलघमी पाणी धरणात शिल्लक असून मराठवाड्यावर पाणीटंचाईचे भीषण सावट आहे.

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सिद्धेश्वर धरणात ७९ टक्के उपयुक्त पाणीसाठा

राज्यात अनेक ठिकाणी धरणे उणे जाऊ लागल्याचे चित्र आहे. उजनी धरण शुन्यावर पोहोचले असून धाराशिवमधील सिना कोळेगावही  कोरडे झाले आहे.  निम्न दुधना १२.२६ टक्क्यांवर गेले आहे.

जाणून घ्या विभागनिहाय कोणत्या धरणात किती पाणी?

नागपूर विभाग

एकूण पाणीसाठा ५५.४३ टक्के
भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांच्या एकूण 16 धरणांमध्ये आज दिनांक 28 फेब्रुवारी रोजी 2667.96 दलघमी एवढा पाणीसाठा शिल्लक राहिला असून एकूण 55. 69% पाणी उरले आहे.

अमरावती विभाग 

अमरावती विभागातील अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये एकूण दहा धरणांमध्ये आता 54.36% पाणीसाठा शिल्लक राहिला असून आज 1867.24 पाणीसाठा शिल्लक आहे.

औरंगाबाद विभाग

औरंगाबाद विभागातील बीड, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर, परभणी या जिल्ह्यांमध्ये एकूण 44 लघु मध्यम व मोठ्या धरणांमध्ये केवळ २७.३१ टक्के पाणी शिल्लक असून आज दिनांक 28 फेब्रुवारी रोजी 2629.65 दलघमी एवढा पाणीसाठा उरला आहे.

नाशिक विभाग

नाशिक विभागातील अहमदनगर, जळगाव, नाशिक जिल्हा मधील 22 धरणांमध्ये 49.97% पाणीसाठा शिल्लक राहिला असून 2393.43 दलघमी एवढे पाणी धरणांमध्ये उरले आहे.

अहमदनगर - भंडारदरा 46.86% मुळा 43.2% निळवंडे 45.87%
नाशिक- दारणा 38.62% गंगापूर 57.79% गिरणा ते 30.1% मुकणे 38.57%

पुणे विभाग

कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जिल्ह्यातील एकूण 35 धरणांमध्ये आता 49.21 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. आज 8829.47 दलघमी पाणी धरणांमध्ये उरले आहे.

कोल्हापूर- दूध गंगा 53.47%, राधानगरी 62.77%
पुणे- चाकसमान 46.94% पावरा 48.70% खडकवासला ५९.६०%, मुळशी ६०.४० टक्के
सांगली- वारणा 56.98%
सातारा-कोयना 59.70%

कोकण विभाग

कोकणातील पालघर रायगड सिंधुदुर्ग ठाणे या जिल्ह्यांमध्ये आता 55.38% पाणीसाठा शिल्लक राहिला असून १५४६.४९ दलघमी पाणी उरले आहे.

Web Title: Alarming! 46.60 percent water remaining in the dams of the state now, how much stock in which dam?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.