Join us

Kolhapur Dam Water Level : या जिल्ह्यातील सर्वच धरणे तुडुंब भरली जाणून घ्या प्रमुख धरणांचा पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 10:43 AM

यंदा जुलै महिन्यात झालेल्या धुवांधार पावसाने जिल्ह्यातील सर्वच धरणे तुडुंब झाल्याने कोल्हापूरकरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरण क्षेत्रात सरासरी १०८९ मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे.

कोल्हापूर  : यंदा जुलै महिन्यात झालेल्या धुवांधार पावसाने जिल्ह्यातील सर्वच धरणे तुडुंब झाल्याने कोल्हापूरकरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरण क्षेत्रात सरासरी १०८९ मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे.

सर्वाधिक ६३६६ मिलिमीटर पाऊस पाटगाव धरण क्षेत्रात झाला असून, सर्वांत कमी आंबेओहोळ प्रकल्पात १८१७ मिलिमीटर झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ६५ टक्के पाऊस झाला आहे.

धरण क्षेत्रात १६ ऑगस्टपर्यंत सरासरी ३९७८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी याच दिवसापर्यंत सरासरी २८८९ मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यामुळे सर्व धरणे तुडुंब झाली आहेत.

भुदरगड तालुक्यातील पाटगाव, चंदगड तालुक्यातील 'घटप्रभा' व गगनबावडा तालुक्यातील कोदे या धरण क्षेत्रात पाऊस अक्षरशः सुपाने ओतल्यासारखा असतो. त्यामुळेच आतापर्यंत येथे अनुक्रमे ६३६६, ६२५१ व ५२२९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. अजून दोन महिने पावसाळा आहे, त्यामुळे किमान ९ हजार मिलिमीटरपर्यंत पाऊस होईल.

जिल्ह्यात ९२ टीएमसी पाणीसाठाजिल्ह्यात राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा, भुदरगड, चंदगड, आजरा या ९२ टीएमसी पाणीसाठा तालुक्यांत तब्बल १५ धरणे आहेत, त्याशिवाय वारणा धरण शिराळा तालुक्यात असले तरी त्याचा सर्वाधिक लाभ कोल्हापूरला होतो. त्यामुळे सोळा धरणात ९२ टीएमसी पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणे, पाऊस व पाणीसाठा

धरणक्षमता टीएमसीपाऊस मिलिमीटर
राधानगरी ८.३६४४५०
तुळशी ३.४७ ३८९१
वारणा ३४.३९३०००
दूधगंगा२५.३९३२४९
कासारी२.७७४०७०
कडवी २.५१३४००
कुंभी २.७१४१०१
पाटगाव ३.७१६३६६
चिकोत्रा१.५२ २५६८
चित्री१.८८ ३४३० 
जंगामहट्टी१.२२ २६६०
घटप्रभा१.५६ ६२५१
जांबरे०.८२ ४४७८
आंबेओहोळ१.२४ १८१७
सर्फनाला०.६७ ४७००
कोदे०.२१ ५२२९
टॅग्स :धरणपाणीकोल्हापूरपाऊसराधानगरी