निरा खोऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे खोऱ्यातील धरणांच्यापाणीपातळीने पन्नाशी ओलांडली आहे. असाच पाऊस पडत राहिला तर ऑगस्टअखेर निरा खोऱ्यातील धरणे शंभर टक्के भरतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. येणाऱ्या उन्हाळ्यात निरा खोऱ्यातील पिण्याच्या व सिंचनाचा पाणी प्रश्न सुटेल.
यंदा निरा खोऱ्यात उशिरा का होईना पावसाने जोर धरल्याने गत सप्ताहातील पाण्याची पातळी ३६ टक्क्यांवरून पन्नाशी ओलांडत ५५ टक्के झाली असून अशीच पावसाची परिस्थिती राहिल्यास निरा खोऱ्यातील वीर, भाटघर, निरादेवधर, गुंजवणी या चार धरणांची पाणी पातळी शंभरी गाठेल.
गत वर्षीच्या पावसाळ्यात चार धरणांची सरासरी पाणीपातळी २३ दलघफू म्हणजे ४७:६१ टक्के एवढी होती यंदा पातळी २६:५७० दल घनफूट म्हणजे ५४:१८ टक्के इतकी झाली आहे.
निरा खोऱ्यात पडणाऱ्या पावसामुळे चारही धरणांत २:६११ दलघफू पाणी पातळी वाढत आहे. असाच पाऊस पडत राहिल्यास लवकरच चारही धरणांत १०० टक्के पाणीसाठा होईल.
चार धरणांतून पाण्याचा विसर्ग■ निरा उजव्या कालव्यातून १००३ क्युसेक.■ निरा डाव्या कालव्यातून ६०० क्युसेक.■ निरा उजव्या व डाव्या कालव्यातून एकूण १ हजार ६०३ क्युसेक पाणी विसर्ग.
चारही धरणांची एकूण आजची स्थिती■ पाणीसाठा २६:५७० दलघमी ५४:१८ टक्केगतवर्षाची परिस्थिती■ पाणीसाठा २३:००८ दलघमी ४७:६१ टक्के
पाणीसाठा स्थितीभाटघर धरण - आजचा पाऊस ३१ मिमी आजखेर पाऊस ४०२ मिमी धरणातील पाणीसाठा १२:९४२ दलघमी ५५:०७ टक्केनिरा देवघर धरण - पाऊस ८९ मिमी आजखेर ८५६ मिमी पाणीसाठा ५:६७२ दलघमी ४८:३६ टक्केवीर धरण - पाऊस ६ मिमी आजखेर १८९ मिमी पाणीसाठा ५:६८३ दलघमी ६०:४० टक्केगुंजवणी धरण - पाऊस ६५ मिमी आजरवेर १०६० मिमी पाणीसाठा २:२७२ दलघमी ६१:५८ टक्के