Join us

Almatti Dam: अलमट्टी धरणाचे सर्वच २६ दरवाजे उघडले पुराचा धोका वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 4:45 PM

आलमट्टी धरणाची Almatti Dam Water Level क्षमता १२३.०८ टीएमसी व पाणीपातळी ५१९.६० मीटर असून सध्या धरणात ९७ टीएमसी पाणी व पातळी ५१७ मीटर आहे. या धरणात ४ लाख क्युसेक प्रवाह आल्यास पुराचा धोका निर्माण होतो.

बेळगाव : अलमट्टी धरणाचे सर्व २६ दरवाजे उघडण्यात आले असून, रविवारी विसर्ग वाढवण्यात येऊन आता १ लाख ५० हजार क्युसेक करण्यात आला आहे, तर आवक ८७,२१५ क्युसेक असल्याची माहिती जमखंडी उपविभाग अधिकारी श्वेता बेडीकर यांनी दिली.

आलमट्टी धरणाची क्षमता १२३.०८ टीएमसी व पाणीपातळी ५१९.६० मीटर असून सध्या धरणात ९७ टीएमसी पाणी व पातळी ५१७ मीटर आहे. या धरणात ४ लाख क्युसेक प्रवाह आल्यास पुराचा धोका निर्माण होतो.

त्याचप्रमाणे जमखंडी तालुक्यातील हिप्परगी ६ टीएमसी क्षमतेच्या धरणात आवक ८७१११ क्युसेक व विसर्ग ८१००० क्युसेक असून पाणीसाठा ३.१४८ टीएमसी आहे.

सध्या धरण ५२.४६ टक्के भरले आहे. या धरणात २ लाख ३५ हजार क्युसेकहून अधिक प्रवाह आल्यास धोका असून जमखंडी तालुक्यातील मुतूर, तुबची या गावांना सर्वप्रथम धोका संभवतो, अशी माहिती जमखंडी उपविभाग अधिकारी श्वेता बेडीकर यांनी दिली.

बागलकोट जिह्यातील नंदगाव, ढवळेश्वर आदी नदीकाठच्या गावाला जिल्हाधिकारी जानकी के. एम. यांनी भेट देऊन संभाव्य पुराची माहिती जाणून घेतली.

अधिक वाचा: पंचगंगेने दिला महापुराचा इशारा, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा वाचा सविस्तर

टॅग्स :धरणपाणीपूरकर्नाटककोल्हापूरपाऊसकोल्हापूर पूर