हवामानात होणाऱ्या टोकाच्या बदलांमुळे जगभरातील उभयचर प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गाावर असून हवामान बदल हे प्रमुख कारण असल्याचे ‘नेचर जर्नलच्या’ अहवालातून समोर आले. उभयचर प्राण्यांच्या या प्रजाती सातत्याने धोक्याच्या पातळीमध्ये नोंदवल्या गेल्या आहेत.
जगभरातील उभयचर प्राण्यांची स्थिती खालावत चालली आहे. सुमारे ४०.७ टक्के प्रजाती धोक्यात असल्याचे या अहवालातून स्पष्ट होते. यामध्ये भारतातील अरबी समुद्राच्या दक्षिण टोकापासून कोकण पट्ट्यातील उभयचर प्राण्यांना धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतातून उभयचरांच्या सुमारे ४७२ प्रजाती ज्ञात आहेत, त्यापैकी सुमारे ५०% स्थानिक आहेत.
बेडकांची डर्रावss डर्राव ss होणार बंद?
शेतकऱ्यांसाठी उपयोगी समजल्या जाणाऱ्या बेडकांची डर्राव डर्राव आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. कमी होत चाललेल्या पावसाने बेडकांचा अधिवास धोक्यात आल्याचेही हा अहवाल सांगतो. उभयचर प्राण्यांच्या प्रजातींमध्ये बेडकाच्या प्रजातींना लाल श्रेणीत टाकण्यात आले आहे.
बुरशीजन्य साथीने शेकडो बेडकांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. या अहवालात लाल यादीत म्हणजेच सर्वाधिक धोका असणाऱ्या विभागात या रोगाची गणना करण्यात आली आहे. हवामान बदलांमुळे दुष्काळ आणि आगीची वारंवारिता, कालावधी आणि तीव्रता वाढत आहे. कमी झालेल्या पावसाने मातीची उच्च पातळी आणि पानांच्या ओलाव्यावर अवलंबून असलेल्या बेडकांना अंडाशयांच्या निर्मितीमध्ये अडचण निर्माण करतात.
ऑस्ट्रेलियातील उष्ण कटिबंधीय आणि ब्राझिलच्या अटलांटिक जंगलातीील हवामान बदलामुळे कमी झालेल्या पावसामुळे थेट बेडकांच्या अधिवासावर त्याचा परिणाम झाला असून बेडकांच्या जाती नष्ट होताना दिसत आहेत. भारताचा पश्चिम घाट हा उभयचर प्रजातींमध्ये खूप समृद्ध आहे ज्यामध्ये बेडूक, टोड्स आणि सेसिलियनच्या 117 प्रजाती आहेत. या जैव-भौगोलिक प्रदेशात एकोणपन्नास प्रजाती स्थानिक आहेत.
नक्की कोणत्या धोक्यांमध्ये स्थिती बिघडत आहे हे समजून घेण्यासाठी कालांतराने लाल श्रेणीत गणल्या गेलेल्या प्रजीतींच्या संचांचे परिक्षण करण्यात आले.यामध्ये हवामान बदलाचे परिणाम, उभयचर प्राण्यांचा अधिवास नष्ट होणे किंवा या प्रजाती लुप्त होण्याची जोखीम वाढत असल्याचे समोर आले आहे.
उभयचर प्राण्यांच्या संवर्धनासाठी
जैवविविधतेच्या संकटाला धोरणात्मक प्रतिसाद देण्याची आवश्यकता आहे. जागतिक आणि राष्ट्रीय जैवविविधता संवर्धन लक्ष्यांच्या दिशेने जाणिवपूर्वक प्रयत्नांची व पुरेशा संसाधनांची गरज आहे. या जातींचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि देशांतर्गत सल्लामसलत तसेच निधी उभारणी आवश्यक असल्याचे तज्ञ सांगतात.