Join us

पाणी पातळी खालावलेलीच, अडीच महिन्यात जाणवू शकते टंचाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 10:49 AM

मागच्या पावसामुळे दहा टक्क्यांनी वाढला होता पाणीसाठा, तात्पुरता मिळाला दिलासा

५ ऑक्टोबरपासून परतीचा पाऊस सुरू होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती; परंतू १५ ऑक्टोबर उलटूनही परतीच्या काळात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत. मागच्या महिन्यात पाणीसाठा असा [दलघमी] झालेल्या पावसामुळे बीड जिल्ह्यातील धरणांमध्ये १२ टक्क्यांवरील पाणीसाठा २२ टक्क्यांवर आला असला तरी हे पाणी फार दिवस पुरणार नसल्याचा अंदाज अधिकारी व्यक्त करीत आहेत. 

जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पेरण्या करता आल्या नाहीत. जुलै महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. परंतु धरणाची परिस्थिती सुधारली नव्हती. जिल्ह्यातील १४३ लहान-मोठ्या धरणांतील पाणीसाठा कमी-कमी होत गेला. सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत सर्व धरणांमध्ये १२ टक्केच पाणीसाठा शिल्लक होता. परंतु गणपती बाप्पांच्या आगमनानंतर जिल्हाभरात पावसाला सुरुवात झाली.

दहा दिवसांच्या कालावधीत झालेल्या पावसामुळे धरणांची पाणीपातळी १० टक्क्यांनी वाढली. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळाला होता. परंतु एवढ्या कमी साठ्यात पुढील आठ महिने पाण्याचा प्रश्न मिटेल का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अद्यापही अनेकांना परतीच्या पावसाची आशा आहे, परंतु तसे संकेत हवामान खात्याने सध्या तरी दिले नाहीत.

असा आहे पाणीसाठा

अडीच महिन्यात जाणवू शकते टंचाई

बीड जिल्ह्यातील १४३ लहान-मोठ्या पाऊस सुरू धरणांत सद्य:स्थितीला २२.३८ एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. काही प्रकल्पात थोडेसे पाणी काही जोत्याखाली तर काही कोरडे आहेत. उपलब्ध पाणीसाठा किती दिवस पुरेल हा प्रश्न निर्माण झाला आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दर आठ दिवसांना जवळपास २ टक्क्यांनी पाणीसाठा कमी होतो. त्यामुळे जवळपास अडीच महिन्यांनंतर पाणीटंचाई जाणवू शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे.

६ प्रकल्प कोरडे

■ जिल्ह्यातील ६ प्रकल्प कोरडे आहेत. आष्टी तालुक्यातील कांबळी येथील मध्यम प्रकल्प तर शिरूर तालुक्यातील फुलसांगवी, आष्टी तालुक्यातील पारगाव, बीड तालुक्यातील सुलतानपूर, आष्टी तालुक्यातील बळेवाडी, आष्टी तालुक्यातील पारगाव नंबर- २ व शिरूर तालुक्यातील वारणी हे लघू प्रकल्प कोरडे पडले आहेत.

■ ५१ लघू प्रकल्प जोत्याखाली आहेत, तर आष्टी तालुक्यातील कडी, तलवार, पार्थी तालुक्यातील बेलपारा, परळी तालुक्यातील बोरणा व केज तालुक्यातील वाघेबाभूळगाव हे पाच मध्यम प्रकल्प जोत्याखाली आहेत.

टॅग्स :पाणीकपातबीडधरणपाऊस