महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील औराद शहाजनी परिसरात चौथ्या दिवशीही उष्णतेची लाट असून, रविवारी वर्षभरातील उच्चांकी ४४.५ तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, रस्त्यावर शुकशुकाट पाहावयास मिळत आहे.
औराद शहाजानी येथील हवामान केंद्रावर रविवारी ४४.५ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २६ अंशांची नोंद झाली आहे. वाढीव तापमानामुळे परिसरामध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून, अंगाची लाहीलाही होताना दिसत आहे.
पूर्वेकडून आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक सीमा भागातून उष्णतेची लाट येत असल्यामुळे या भागाचे तापमान दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. यापूर्वीच हवामान केंद्राने '५ में हा या वर्षातील सर्वाधिक उच्चांकी तापमान राहण्याचा अंदाज वर्तविलेला होता.
पुढील काळामध्ये काही दिवस तापमान ४० अंशाच्या पुढे राहणार असले तरी या आठवड्यात शेवटच्या दिवसांमध्ये तापमान कमी होण्यास सुरुवात होऊन ९ ते १० तारखेनंतर या भागामध्ये अवकाळी पावसाचे वातावरण तयार होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात गेल्या चार दिवसांपासून उष्णतेची लाट आहे. त्यामुळे अनेकजण सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत घराबाहेर पडणे टाळत आहेत. दरम्यान, दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. परिणामी, बाजारपेठेतील व्यवसायही थंडावला आहे.