Join us

राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये गाठेना पावसाची सरासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2023 11:37 AM

पहिल्या तीन महिन्यांत राज्यात सरासरीच्या तुलनेत तब्बल १३ टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यात मराठवाडा व मध्य महाराष्ट्र तीव्र दुष्काळाच्या छायेत असून, पूर्ण विदर्भात कमी पाऊस झाला आहे.

यंदा मॉन्सून सरासरीच्या ९६ टक्के पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज सपशेल फोल ठरला. पहिल्या तीन महिन्यांत राज्यात सरासरीच्या तुलनेत तब्बल १३ टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यात मराठवाडा व मध्य महाराष्ट्र तीव्र दुष्काळाच्या छायेत असून, पूर्ण विदर्भात कमी पाऊस झाला आहे. राज्यातील २९ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यंदा सरासरीइतका पाऊस पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज होता.

मात्र यंदा मान्सूनचा अक्ष हा उत्तरेकडे झुकलेला असल्याने हिमालयालगत धुवांधार पाऊस बरसला. त्याचवेळी दक्षिणेकडील राज्यात दुष्काळसदृश स्थिती असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्याचे सुरुवातीचे तीन महिने संपले, तरीही संपूर्ण राज्यात मोजके जिल्हे सोडल्यास पुरेसा पाऊस झालाच नाही. त्याचवेळी सप्टेंबर महिन्यातही पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सर्वाधिक फटका मराठवाड्याला!मराठवाड्यातील नांदेड वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे, तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

टॅग्स :हवामानपाऊसमहाराष्ट्रमराठवाडापीकपेरणीदुष्काळ