Lokmat Agro >हवामान > हवामानशास्त्रज्ञ व्हा.. काय आहे शैक्षणिक पात्रता; इथे मिळेल एवढ्या पगाराची नोकरी

हवामानशास्त्रज्ञ व्हा.. काय आहे शैक्षणिक पात्रता; इथे मिळेल एवढ्या पगाराची नोकरी

Become a Meteorologist.. What is the Educational Qualification; You can get such a salary job here | हवामानशास्त्रज्ञ व्हा.. काय आहे शैक्षणिक पात्रता; इथे मिळेल एवढ्या पगाराची नोकरी

हवामानशास्त्रज्ञ व्हा.. काय आहे शैक्षणिक पात्रता; इथे मिळेल एवढ्या पगाराची नोकरी

हवामानशास्त्र ही अर्थ सायन्स विषयाची उपशाखा आहे. यात हवामानाचे विश्लेषण केले जाते. हवामानाचा अंदाज घेण्यासाठी हवामानशास्त्रज्ञ हवामान आणि वातावरणाशी संबंधित पैलूंवर संशोधन करतात.

हवामानशास्त्र ही अर्थ सायन्स विषयाची उपशाखा आहे. यात हवामानाचे विश्लेषण केले जाते. हवामानाचा अंदाज घेण्यासाठी हवामानशास्त्रज्ञ हवामान आणि वातावरणाशी संबंधित पैलूंवर संशोधन करतात.

शेअर :

Join us
Join usNext

हवामानशास्त्र ही अर्थ सायन्स विषयाची उपशाखा आहे. यात हवामानाचे विश्लेषण केले जाते. हवामानाचा अंदाज घेण्यासाठी हवामानशास्त्रज्ञ हवामान आणि वातावरणाशी संबंधित पैलूंवर संशोधन करतात.

आजकाल वृत्तसंस्था आणि खासगी संस्थाही हवामानशास्त्रज्ञांची नियुक्ती करीत आहेत.पर्यावरण क्षेत्रात काम करण्याची आवड असलेल्यांना हा करिअरचा चांगला पर्याय उपलब्ध आहे. विविध सरकारी क्षेत्रात हवामानशास्त्रज्ञांना मोठी मागणी आहे.

अंतराळ संशोधन आणि विकास संस्था, संरक्षणातील संशोधन आणि विकास संस्था, हवामान अंदाज विभाग, खनिकर्म विभाग अशा ठिकाणी या तज्ज्ञांची गरज भासत असते.

हवामानशास्त्रज्ञांच्या जबाबदाऱ्या वैविध्यपूर्ण असू शकतात. त्या साधारणपणे पुढीलप्रमाणे असतात.
१) औद्योगिक
३) संशोधन
२) भौतिक
४) अध्यापन

आवश्यक कौशल्ये
-
हवामानशास्त्रज्ञांना वातावरणाशी संबंधित माहितीचे विश्लेषण करावे लागते.
- दीर्घकाळ हे काम करावे लागते. कारण हवामान विभाग २४ तास कार्यरत असतो. त्यामुळे हे काम आव्हानात्मक आहे.
- त्यांना विविध विभागांच्या तज्ज्ञांशी समन्वय साधावा लागतो.
- टीमवर्क करावे लागते.
- थोडक्यात विश्लेषण, संगणकाचा वापर, अचूकता, संयम, निरीक्षण शक्ती, संवाद कौशल्य यांचा कस लागतो.

वेतन
- शेती, हवामान या क्षेत्रात तज्ज्ञांना दरमहा २५ ते ३० हजार चेतनाने सुरुवात करता येते.
- अनुभवाच्या आधारे ६० हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत वेतन वाढते.
- अवकाश संशोधन आणि विकास क्षेत्रातही संधी आहेत. येथे वेतनश्रेणी तुलनेने जास्त असते.
- हवामान संशोधन केंद्र, कृषी नियोजन विभाग, हवामान सल्लागार संस्था, हवाई दल या तज्ज्ञांना मागणी असते.

करिअरच्या संधी
-
'डीआरडीओ', 'इस्रो', 'नाबार्ड' यांसारख्या सरकारी आस्थापनांमध्ये हवामानशास्त्रज्ञांना मागणी असते.
- 'रिलायन्स', 'महिंदा', 'टाटा अशा काही खासगी कंपन्याही हवामानतज्ज्ञांना नेमतात.
- अनेक खासगी कंपन्या नैसर्गिक संसाधनाशी संबंधित उद्योगात प्रवेश करीत असल्याने खासगी क्षेत्राकडून या तज्ज्ञांना मागणी वाढू लागली आहे.
- अर्थात शैक्षणिक पात्रता, अनुभव, विषयातील ज्ञान यावर या करिअर संधी ठरतात.

शैक्षणिक पात्रता
-
हवामानशास्त्र हे वातावरणीय विज्ञान देखील मानले जाते.
- जे विद्याथी हवामानशास्त्रात आपले करिअर करु इच्छितात त्यांनी वातावरणशास्त्रात पदवी घेणे आवश्यक आहे.
- या विषयातील बी.टेक. किंवा बी.एस्सी. पदवीधारकांनी या क्षेत्रातील करिअरचे दरवाजे खुले होतात.
- तसेच पदवीधारकांना पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमही निवडून हवामानशास्त्रात करिअर करता येऊ शकते.

Web Title: Become a Meteorologist.. What is the Educational Qualification; You can get such a salary job here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.