Lokmat Agro >हवामान > बीडमध्ये दोन दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी, माजलगाव, मांजरा धरण अजूनही शुन्यावर

बीडमध्ये दोन दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी, माजलगाव, मांजरा धरण अजूनही शुन्यावर

Beed dam water storage: Heavy rains in Beed for two days, Majalgaon Manjra dam still at zero | बीडमध्ये दोन दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी, माजलगाव, मांजरा धरण अजूनही शुन्यावर

बीडमध्ये दोन दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी, माजलगाव, मांजरा धरण अजूनही शुन्यावर

जलसंपदा विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, वाचा जिल्ह्यातील धरणप्रकल्पांचा पाणीसाठा..

जलसंपदा विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, वाचा जिल्ह्यातील धरणप्रकल्पांचा पाणीसाठा..

शेअर :

Join us
Join usNext

मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची जोरदार हजेरी लागत असून बीड जिल्ह्यातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. ओढे, नालेही ओसंडून वाहतानाची चित्र समाजमाध्यमांवर फिरत असताना जिल्ह्यातील धरणासाठे अजुनही शुन्यावर असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले.

बीड जिल्ह्यातील शेकडो गावांची तहान भागवणारे सर्वात अधिक क्षमतेचे माजलगाव धरण अजूनही शुन्यावरच असल्याची माहिती जलसंपदा विभागाने जाहीर केली. तसेच मांजरा धरणातही शुन्य टक्के उपयुक्त पाणीसाठा असल्याने अनेक गावे तहानलेलीच असल्याचे चित्र आहे.

बीड जिल्ह्यात लहान मोठे ८ जलप्रकल्प आहेत. यातील १४२.३० दलघमी क्षमतेचे माजलगाव धरण मागील वर्षी २१.५८ टक्के भरले होते. यंदा ते अजूनही शुन्यावरच आहे. तसेच मांजरा धरण मागील वर्षी २२.२४ टक्क्यांवर होते. जे आज शुन्यावर असल्याचे समोर येत आहे.

जिल्ह्यात यंदा शेतीसह जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. शेततळी, विहिरी कोरडीठाक पडली होती. आता पावसाला सुरुवात झाल्याने तापमानापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी पिण्याचा आणि शेतीचा, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अजूनही काही प्रमाणत तीव्र असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Beed dam water storage: Heavy rains in Beed for two days, Majalgaon Manjra dam still at zero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.