Join us

Bhatghar Dam : भाटघर ओहरफ्लो धरणाचे ३० स्वयंचलित दरवाजे उघडले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 2:11 PM

भाटघर धरण भागात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भाटघर धरणाचे ३० स्वयंचलित दरवाजे उघडले असून, धरणातून सुमारे २२ हजार ६३१ क्युसेक विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू झालेला आहे.

भोर : भाटघर धरण भागात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भाटघर धरणाचे ३० स्वयंचलित दरवाजे उघडले असून, धरणातून सुमारे २२ हजार ६३१ क्युसेक विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू झालेला आहे. यामुळे नीरा नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे.

भाटघर धरण १०० टक्के भरलेले आहे. धरण क्षेत्रामध्ये शनिवारी ४१ मिमी पावसाची नोंद झाली असून, पर्जन्यमानात वाढ झाल्यामुळे नीरा नदीपात्रामध्ये सुरू असलेल्या १९ हजार १३१ क्युसेक विसर्गामध्ये वाढ केली.

दुपारी एक वाजता भाटघर धरणाच्या विद्युतनिर्मिती गृहाद्वारे १,६३१ क्युसेक व सांडव्याद्वारे २१,००० क्युसेक विसर्ग असा एकूण २२,६३१ क्युसेक विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू झालेला आहे.

नीरा देवघर धरण सद्यःस्थितीत ९९.३६ टक्के भरलेले असून, धरणामध्ये ११.६५ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. पाणलोट क्षेत्रात कालपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने संध्याकाळी पाणीसाठा १०० टक्के होण्याची दाट शक्यता आहे.

धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्याकरिता जलविद्युत केंद्रामधून विद्युतगृहाद्वारे ७५० क्युसेक इतक्या क्षमतेने साडव्यावरून १७२५ क्युसेकने असा एकूण २४७५ क्युसेकने नदीपात्रात विसर्ग सुरू आहे.

अधिक वाचा: Jayakwadi Dam Water Level : मुळा, सीना धरणातून मोठा विसर्ग जायकवाडीत आलं किती पाणी

टॅग्स :धरणनदीपाऊसभोरपुणे