Lokmat Agro >हवामान > भोजापूर धरण फुल्ल, कालव्याद्वारे पूरपाण्याचा विसर्ग सुरू

भोजापूर धरण फुल्ल, कालव्याद्वारे पूरपाण्याचा विसर्ग सुरू

Bhojapur Dam is full, flood water is being released through the canal | भोजापूर धरण फुल्ल, कालव्याद्वारे पूरपाण्याचा विसर्ग सुरू

भोजापूर धरण फुल्ल, कालव्याद्वारे पूरपाण्याचा विसर्ग सुरू

नाशिक जिल्ह्यातील  सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सोमवारी (दि. ११) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास डाव्या कालव्याद्वारे ५० ...

नाशिक जिल्ह्यातील  सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सोमवारी (दि. ११) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास डाव्या कालव्याद्वारे ५० ...

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक जिल्ह्यातील  सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सोमवारी (दि. ११) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास डाव्या कालव्याद्वारे ५० क्युसेसने पूरपाणी सोडण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. गावांना लाभ होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

गत आठवड्यात पश्चिम पट्ट्यात झालेल्या पावसामुळे म्हालुंगी नदी दुथडी भरून वाहत होती. म्हाळुंगी नदीवरील भोजापूर धरणात सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला ७० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मध्यंतरीच्या काळात पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाण्याची आवक कमी झाली होती. तसेच धरण परिसरात वरूणराजा रुसलेला होता. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरते की नाही, याची शाश्वती नव्हती. मात्र, गुरूवारपासून नदीच्या उगमस्थानावर मुसळधार पाऊस झाल्याने धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन अवघ्या तीन दिवसातच भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाले होते. धरणाच्या सांडव्याद्वारे १५० क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू होता. 

म्हाळुंगी नदीपात्रातून पूरपाण्याचा नांदूरशिंगोटे व दोडी कालव्यावरील विसर्ग सुरू असून, चास शिवारात पाणी पोहोचले होते. म्हालुंगी नदीपात्रात पूरपाणी सोडण्यात आले असून, कमी होणार आहे. मात्र, रविवारी पश्चिम अधिक प्रमाणात धरणातून पाण्याचा पट्ट्यात पावसाने उघडीप दिल्याने झाली होती. तसेच धरण परिसरात विसर्ग होत आहे. नदीकाठच्या गावांना पूरपाण्याचा लाभ होणार असून, नदीवरील बंधारे भरत आहेत. भोजापूर धरण रविवारी सकाळी ओव्हरफ्लो झाल्याने विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांकडून पूरपाणी सोडण्याची मागणी होत होती. पाटबंधारे विभागाने आढावा घेऊन सोमवारी (दि. ११) भोजापूर धरणातून बंधाऱ्यात तर संगमनेर तालुक्यातील सोनेवाडीत पूरपाणी पोहोचण्यास मदत होणार आहे. मात्र, रविवारी पश्चिम पट्ट्यात पावसाने उघडीप दिल्याने पाण्याची आवक कमी झाली आहे.

 पूर्व भागातील बंधारे भरण्याची मागणी

•  सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील काही भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने लाभक्षेत्रातील बंधारे, पाझर तलाव, केटिवेअर भरण्यासाठी कालव्याद्वारे पूरपाणी सोडण्याची मागणी होत आहे. नांदूरशिंगोटे परिसरात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील पिके वाया गेली आहेत.

•  परिसरातील पाझर तलावात पूरपाणी आल्यास शेतकयांना जनावरांसाठी चायाचे पीक घेता येईल. तसेच वाडीवस्तीवर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. मानोरी, कणकोरी, मन्हळ, निन्हाळे आदी भागात पेरणीही झाली नाही तसेच बंधारे अद्यापही कोरडेठाक असल्याने या भागातून पाण्याची मागणी वाढू लागली आहे.

Web Title: Bhojapur Dam is full, flood water is being released through the canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.