फेंगल वादळाचा मोठा परिणाम; राज्यात कसा राहील पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2024 11:26 AM
'फेंगल' बंगालच्या उपसागरात जे चक्रीवादळ तयार झाले त्याचेच हे नाव. हे फेंगल तीन दिवसांपूर्वी पुदुचेरी (तामिळनाडू) किनारपट्टीवर येऊन धडकले. त्यामुळे तामिळनाडूसह, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील काही भागात मुसळधाराही बरसल्या.