Lokmat Agro >हवामान > मराठवाड्यात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे?

मराठवाड्यात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे?

Chance of cloudy weather in Marathwada for the next three days, what should farmers do? | मराठवाड्यात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे?

मराठवाड्यात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे?

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने केली कृषी सल्ल्याची शिफारश

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने केली कृषी सल्ल्याची शिफारश

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात या आठवड्यापासून कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली. उत्तरेतील राज्यांमध्ये वाहणाऱ्या चक्राकार वाऱ्यांमुळे राज्यात गारठा वाढला आहे. दरम्यान, मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहून पुढील तीन दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असल्याचे प्रादेशिक हवामान केंद्राने सांगितले आहे. 

पुढील तीन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही दिनांक 22 व 23 डिसेंबर, 2023 रोजी किमान तापनामात घट होण्याची शक्यता आहे.प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहून पुढील तीन दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही दिनांक 22 व 23 डिसेंबर, 2023 रोजी किमान तापनामात घट होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 22 ते 28 डिसेंबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.मराठवाड्यात दिनांक 24 ते 30 डिसेंबर 2023 दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा जास्त, कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलावा  किंचित कमी झालेला आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. कापसाच्या झाडावरील 40 ते 50 टक्के बोंडे फुटल्यास वेचणी करावी. वेचण्या पंधरा दिवसाच्या अंतराने कराव्यात. पूर्ण फुटलेल्या बोंडातीलच कापूस वेचावा. पहिल्या आणि दूसऱ्या वेचणीचा चांगला आणि कवडी कापूस वेगळा साठवावा. कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेउ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराट्या जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी. 

उशिरा पेरणी केलेल्या तूर पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व फायटोफथोरा मर व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.4 ग्रॅम + मेटॅलॅक्झील + मॅनकोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.उशिरा पेरणी केलेल्या ज्वारी पिकावरील खोडमाशी, खोडकिडी व लष्करी अळी या किडींच्या व्यवस्थापनासाठी नोमुरीया रिलाई 40 ग्रॅम प्रति 10 लिटर  किंवा थायमिथॉक्झाम 12.6% + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5% 2.5 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उशिरा पेरणी केलेल्या ज्वारी पिकात तण नियंत्रणासाठी पिकात कोळपणी करून घ्यावी.

मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  80 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 80 मिली प्रति एकर वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.रब्बी सूर्यफूल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी बागेस पहाटे मोकाट पद्द्धतीने पाणी द्यावे.आंबा बागेत पाणी व्यवस्थापन करावे. द्राक्ष बागेत घडांचा आकार वाढवण्यासाठी द्राक्ष घड पहिल्यांदा 10 पिपिएम जिब्रॅलिक ॲसिडच्या द्रावणात बूडवावेत.

भाजीपाला

भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबडयाच्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत. पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधत गोठ्यात बांधावेत. पशुधनातील प्रजननाच्या समस्यांचे वेळेत निदान आणि योग्य उपचार न केल्यास अधिक तोटा उदभवतो. राज्य शासनाच्या “राज्यव्यापी वंधत्व निवारण अभियानातंर्गत” आपल्या कडील सर्व जनावरांची गाभण करण्याबाबतची तपासणी व उपचार करून घ्यावेत.

Web Title: Chance of cloudy weather in Marathwada for the next three days, what should farmers do?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.