Join us

राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता

By मुक्ता सरदेशमुख | Published: August 02, 2023 7:00 PM

राज्यात आज कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात, खानदेश व विदर्भातही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पश्चिम ...

राज्यात आज कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात, खानदेश व विदर्भातही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

पश्चिम बंगाल क्षेत्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज देशाच्या अनेक भागात पावसाचा अंदाज आहे. पश्चिम बंगालमधील बंकुरा येथे तीव्रता व क्षेत्र 20 किलोमीटर प्रतितास वेगाने वायव्येकडे सरकत आहे.

भारतीय हवामान विभागाचे पुण्यातील प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत हा अंदाज वर्तवला आहे.

आज कोकण, मध्य महाराष्ट्राचा काही भाग तसेच विदर्भात ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार ते अति जोरदार पाऊस कोसळण्याची चिन्हे असून पावसाचा ऑरेंज अलर्ट या भागात देण्यात आला आहे.

विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आज नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर व जालन्यात हलक्या व मध्यम सरींच्या पावसाची शक्‍यता असून उद्या औरंगाबाद जालना परभणीत तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर राहणार असून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

टॅग्स :मोसमी पावसाचा अंदाजपाऊसमोसमी पाऊसशेतकरीहवामानमहाराष्ट्रमराठवाडाविदर्भ