राज्यात कोकण वगळता बहुतांश ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले. राज्यात या आठवड्यात विविध भागात पावसासह गारपीटीचा इशारा देण्यात आला होता.
सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती राजस्थान , कर्नाटकाचा किनारपट्टीचा भाग आणि इशान्या बांग्लादेशावर सक्रीय आहे. परिणामी राज्यात विदर्भ मराठवाड्यासह मध्य व उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज विदर्भातील सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून १६ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ३० ते ५० किमी प्रतितास राहणार असून अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
ऑरेंज अलर्ट- वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा
यलो अलर्ट- सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव,बीड, छत्रपती संभाजीनगर,जालना, परभणी, नांदेड, अहमदनगर, हिंगोली,बुलढाणा, अकोला,अमरावती, नागपूर, गोंदिया