Join us

परभणी, धारशिवसह या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता,येत्या ३-४ तासांत...

By मुक्ता सरदेशमुख | Published: January 09, 2024 2:39 PM

मराठवाड्यात पावसाची शक्यता कुठे? प्रादेशिक हवामान अंदाज काय?

मराठवाड्यात पुढील तीन चार तासात हलक्या पावसाची शक्यता हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार परभणी, धाराशिव, जालना व हिंगोली जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दोन दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व दिनांक 11 जानेवारी रोजी  किमान तापमानात किंचित घट होउन त्यानंतर किमान तापमानात वाढ होईल.आज राज्यात मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. 

संबंधित-महाराष्ट्राच्या विविध ठिकाणी पावसाला सुरूवात; पिकांचे होणार नुकसान

राज्यात मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे जोरदार अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाची तीव्रता अधिक असून तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.

Rain:मध्य-उत्तर महाराष्ट्रात आज जोरदार पावसाची शक्यता, या जिल्ह्यांना अलर्ट

या जिल्ह्यांमध्येही हलका पाऊस

सातारा, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यांतही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमान १ ते २ अंशांने वाढून पुढील दोन दिवसात  पुन्हा तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात पुढील तीन दिवस किमान तापमानात फारसा बदल नसून त्यानंतर २ ते ३ अंशांनी तापमान घसरेल असे प्रादेशिक हवामान विभागाने सांगितले.

टॅग्स :पाऊसहवामानतापमान