Lokmat Agro >हवामान > दक्षिण-मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा खान्देशात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

दक्षिण-मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा खान्देशात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Chance of rain with gale force over South-Central Maharashtra and Marathwada Khandesh | दक्षिण-मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा खान्देशात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

दक्षिण-मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा खान्देशात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

वाचा हवामानाचा सविस्तर अंदाज

वाचा हवामानाचा सविस्तर अंदाज

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज दक्षिण मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि खान्देशात आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण किनारपट्टीवर तापमान उष्ण व आर्द्र हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

चक्राकार वाऱ्यांची स्थिती मध्य महाराष्ट्र ते कर्नाटकापासून केरळापर्यंत विस्कळीत स्वरूपात सक्रीय आहे. परिणामी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात २४ व २५ रोजी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ३० ते ५० प्रतितास राहण्याची शक्यता आहे.

आज कुठे कसे हवामान?

कोकण किनारपट्टी भागात आज उष्ण व आर्द्र हवामान राहणार असून ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात उष्ण तापमानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

सांगली, सोलापूर, परभणी,बीड,हिंगोली, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

Web Title: Chance of rain with gale force over South-Central Maharashtra and Marathwada Khandesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.