राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला असताना तापमानाचा पाराही चढाच आहे. दरम्यान मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपीटीचीही शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दि २५ एप्रिल रोजी बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह, मेघगर्जना , विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी प्रतितास राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
कुठे पावसाची शक्यता
२५ एप्रिल- छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
२६ एप्रिल- छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड
२७ एप्रिल- बीड, लातूर, धाराशिव