Join us

छत्रपती संभाजीनगर, नांदेडसह या जिल्ह्यांना आज वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता, काय आहे हवामानाचा अंदाज?

By मुक्ता सरदेशमुख | Published: March 31, 2024 1:32 PM

कमी दाबाची रेषा उत्तर तमिळनाडू ते कर्नाटक, मराठवाड्यावरून जात आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांमध्ये...

राज्यात एकीकडे तापमानाचा पारा चाळीसपार जात असताना दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कमी दाबाची रेषा उत्तर तमिळनाडू ते कर्नाटक, मराठवाड्यावरून जात आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज आहे.

आजपासून २ एप्रीलपर्यंत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून आज छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड व धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमी राहणार असून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

राज्यात उष्णतेची लाट अन् मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज

  • दिनांक १ एप्रिल २०२४ : रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यात 
  • दिनांक २ एप्रिल २०२४ : रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यात 
  •  तुरळक ठिकाणी तापमान अधिक राहून रात्री उष्णता जाणवेल. 
टॅग्स :पाऊसहवामानतापमान